रंगात सर्वश्रेष्ठ रंग कोणता कोणी सांगावा ? सर्वच अप्रतिम !
हे अप्रतिम रंग जेव्हा एकत्र जमतात तेव्हा जणू परमेश्वराचे प्रेमळ हास्य इंद्रधनुच्या रूपाने दाखवितात. हे इंद्रधनु जेव्हा एकरूप होते तेव्हा त्याचा एक पारदर्शक किरण बनतो. सहज पाहिलं तर काहीच दिसत नाही पण कवडस्यामधून डोकावलं तर त्यांचे रंग छटा-छटातून स्वत:चं अस्तित्व दाखवून हळूच गायब होतात. औंधची वैशिष्टेही अशीच कवडस्यासारखी स्वतःच्या अस्तित्वाची झलक दाखवतात.
वैशिष्ट्ये : औंध ... एक अस्तित्वाची झलक !

ज्याची सूर्याच्या प्रखरतेशी आणि सागराच्या खोलीशी तुलना होते अशा ज्ञानाची महती औंधच्या राजानेही ओळखली होती. म्हणूनच त्याने लावलेले शिक्षणाचे रोपटे आज वृक्ष बनून रसाळ गोमटी फळे देत आहे...

१.) औंध शिक्षण मंडळ, औंध :

११४ वर्षांची शैक्षिणिक परंपरा लाभलेले औंध शिक्षण मंडळ, औंध पंचक्रोशीतील विध्यार्थांच्या जडण घडणीचे उगम स्थान आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून या शिक्षण संस्थेने आपला विस्तार केला आहे. "शील शरीर अध्ययन " ह्या आपल्या ब्रिद वाक्यप्रमाणे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करताना ह्या संस्थेने विध्यार्थांच्या सर्वांगीण कलागुणांच्या विकासाकडे जास्त भर दिलेले दिसून येतो.

२.) शाळा :

संस्थान कलात म्हणजे १८५० च्या पुढील काळात कै. श्रीमंत श्रीनिवास पंतप्रतिनिधी हे औंधचे अधिपती होते. या काळात गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय होती.
आजमितीस औंध मध्ये जिल्हापरिषदेच्या मुला-मुलींची प्राथमिक शाळा, तर औंध शिक्षण मंडळ, औंध यांच्या श्री भवानी बाल विद्या मंदिर, श्री. श्री. विद्यालय, औंध, वाघजाई देवी विद्यालय, त्रिमली, राजा भगवंतराव ज्युनियर कॉंलेज, औंध व १९९४ साली राजा श्रीपतराव महाविद्यालय, औंध आणि शिवगर्जना प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळा आहे.

अ.) जीवन शिक्षण विद्या मंदिर, औंध ( जिल्हा परिषद शाळा १, २ ) :

जीवन शिक्षण विद्या मंदिर, औंध शाळा क्र. १ हि जिल्हा परिषदेची मुलांची प्राथमिक शाळा व जि. प. कन्याशाळा, औंध नं. २ हि मुलींची प्राथमिक शाळा अश्या दोन प्राथमिक शाळा होत्या सध्या ह्या दोन्ही शाळा एकत्र करण्यात आलेल्या आहेत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, औंध ह्या नावे कार्यरथ आहेत. पूर्वी मुलांची शाळा तुरुंगाच्या इमारतीमध्ये भारत असे व मुलीच्या शाळेस स्वतंत्र अशी जागा-इमारत होती आता तुरुंगाच्या इमारती मध्ये आय. टी. आय. सुरु झाल्याने पाटीमागे प्राथमिक शाळेसाठी एक नवीन इमारत निर्माण केली आहे.

ब.) श्री भवानी बाल विद्या मंदिर :

२००५ साली औंध येथे औंधपंचक्रोशीतील भावी पिढीतील लहान मुलांना सेमी इंग्रजी शिक्षण मिळावे या हेतूने श्रीमंत गायीत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी औंध शिक्षण मंडळ, औंधच्या माध्यमातून श्री भवानी बाल विद्या मंदिर, औंध स्थापन केले.

क.) श्री. श्री. विद्यालय, औंध :

१. इतिहास : - सन १८९७ - १९०१ साली बाळासाहेब हे औंध संस्थांचे चीफ सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते या काळात त्यांनी संस्थानवर असणारे सर्व कर्जाची फेड केली हे उल्लेखनीय आहे. दरम्यानकच्या काळामध्ये कराडदेवी प्लेगच्या साथीमुळे औंधला आणण्यात आली हि देवी कराडस असताना उत्सवासाठी व इतर कार्यासाठी होणारा खर्च कमी झाला परिणामी सहा हजारांच्या वर बचत होऊ लागली होती. देवी करितां सुमारे वीस हजारांचा खर्च कऱ्हाड येथे असताना होत असे. हा शिल्लख राहिलेला पैसा योग्य मार्गी लावावा या हेतूने श्रीमंत बाळासाहेब यांनी त्या पैशाने औंधास हायस्कूल काढावें, असा विचार केला. या हायस्कूलमध्यें मुलांना फी तर नाहीच पण कांही गरीब विध्यार्थांस भरपूर माधुकरी ध्यावी, या प्रमाणे सन १८९८ सालीं हायस्कूल सुरु केलें. हायस्कुलास श्रीनिवास हायस्कूल असे वडिलांचे नावं देण्याचा बाळासाहेबांचा मानस होता पण वडिलांच्या इच्छेनुसार श्री यमाई श्रीनिवास असे नावं ठेवण्यात आले. हायस्कूलच्या इमारतीवर जी पाटी आहे तीवरहि श्रे यमाई हीं अक्षरें मुख्य पाटीच्या वर अर्धवर्तूलांत मागून घातल्याचे स्पष्ट दिसते आहे, हीं पाटी १९०० सालीं तयार करण्यात आली आहे.
१९१३ साली हायस्कूलला मुबई विध्यापिठाची संमती मिळाली व ते हायस्कूल झाले, त्या साली प्रथम एकच विध्यार्थी विध्यापिठाच्या मैंट्रिक परीक्षेस पाठविण्यात आला व तो चांगल्या तऱ्हेने पासही झाला. त्यामुळे हायस्कूल म्हणून श्रीयमाई श्रीनिवास हायस्कुलास कायमची मान्यता मिळाली, तो पहिला विध्यार्थी म्हणजेच डॉं. के. ना. वाटवे होय.
याच विध्यालायामध्ये शिक्षण घेतलेले विध्यार्थी पुढे विविध क्षेत्रात नावं लौकिक झाले असे काही विध्यार्थी -
१. सन १९४४ ते १९४८ औंधचे पहिले पंतप्रधान, बी. ए. (ऑनर्स.), एम. ए. (ऑक्सफोर्ड युनिवरसिटी), बॅरीस्टर-एट-लॉ, लिंकन'स इन्न; भारताचे परराष्ट्रातील राजदूत आणि पद्मश्री पुरस्कार विजेते श्रीमंत परशुरामराव भगवानराव उर्फ अप्पासाहेब पंडित पंतप्रतिनिधी.
२. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक श्री. पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी.
३. साहित्य, चित्रपट, गीतरचना, कथा, कादंबरी, गीतरामायणकार, पद्मश्री श्री. गजानन दिगंबर माडगूळकर ( गदिमा ).
४. व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले असे किर्लोस्कर समुहाचे संचालक, श्री. शंतनुराव किर्लोस्कर.
५. मराठी लेखक, कादंबरीकार, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू बँक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अॅड. शंकर रामचंद्र खरात.
६. प्राचीन मराठी पंडिती काव्य, रसविमर्श, पाच मराठी कवी, संस्कृत काव्याचे पंचप्राण, सांस्कृत साहित्यिक प्रा. डॉं. केशव नारायण वाटवे.
७. लावणी, शाहिर श्रीधर कृष्ण कुलकर्णी उर्फ शाहीर पठ्ठे बापूराव.
८. मराठी कादंबरीकार नागनाथ संतराम इनामदार.
९. राज्याचे माजी कलासंचालक श्री. माधवराव सातवळेकर.
१०. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि साहित्यिक श्री. मधुकर गोपाळ ऊर्फ बाबा पाठक.
११. शिक्षणतज्ञ श्री. माधव दत्तात्रय कुलकर्णी.
१२. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री, रेल्वे राज्यमंत्री श्री. रामचंद्र दामोदर नाईक.

ड.) वाघजाई देवी विद्यालय, त्रिमली :

१९८४ साली त्रिमली येथे औंधपंचक्रोशीतील विध्यार्थ्यांना ज्ञान दान व्हावे या हेतूने कै. श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी औंध शिक्षण मंडळ, औंधच्या माध्यमातून वाघजाई देवी विद्यालय, त्रिमली स्थापन केले.

३.) महाविद्यालय :

१९८९ साली औंध येथे औंधपंचक्रोशीतील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने कै. श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी व कै. भगवंतराव पंतप्रतिनिधी यांनी औंध शिक्षण मंडळ, औंधच्या माध्यमातून राजा भगवंतराव ज्युनियर कॉंलेज, औंध व १९९४ साली राजा श्रीपतराव महाविद्यालय, औंध स्थापन केले.

४.) आय. टी. आय. :

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन, औधोगिक प्रशिक्षण संस्था, औंध ची स्थापना ऑगस्ट १९९७ ला झाली. सुरुवातीस १०७ विध्यार्थी संख्या होते पुढे वाढून १४६ झाले. इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रोनिक मॅक्यानिकल, वायरमन, वेल्डर, फिटर, टेलरिंग अॅन्ड कटिंग असे सहा कोर्सेस शिकवले जातात. यासाठी शिक्षक व शिशाकेतर कर्मचारी वर्ग मिळून १७ लोक आहेत.

५.) आश्रम शाळा :

शिवगर्जना प्रतिष्ठान संचलित प्राथमिक आश्रमशाळेची स्थापना १९९६ ला झाली. १६.०६.१९९८ ला प्राथमिक शाळा सुरु इ. पहिला वर्ग + ७ वर्ग तर ०२.०७.२००४ ला माध्यमिक स्थापना इ. आठवी वर्ग + १० वर्ग, सुरुवातीस विध्यार्थी संख्या इ. पहिली - २५ विध्यार्थी आज अखेर निवासी प्राथमिक - १२० माध्यमिक १२० अनिवासी पट माध्यमिक २४ ( ८७ मुल ३७ मुली ) प्राथमिक ५०, या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक ६ + १ शिक्षिका तर माध्यमिक शिक्षक ४ + १ शिक्षिका आणि शिशाकेतर ११ लोक कार्यरत आहेत.

६.) विद्यार्थी वस्तीग्रह ( मुलांचे / मुलींचे ) :

संस्थानकाळामध्ये श्रीमंत बाळासाहेबांनी श्रीकेदारेश्वर व पंचवटी अशी दोन मोफत विध्यार्थी वस्तीग्रहे निर्माण केली होती. गरजू व गरीब विध्यार्थांना हि वस्तीग्रहे खूप उपयुक्त ठरली म्हणूनच औंध येथे पूर्ण महाराष्ट्रातून विध्यार्थी येत असत. पुढे स्वातंत्र्यानंतर हि वस्तीगृहे बंद पडली आता त्यांची एकादी खून देखील औंध मध्ये पाहवयास मिळत नाही.
परंतु विकास अभियान संस्थेचे मुलींचे विकास वस्तीग्रह व मुलांचे विकास वस्तीग्रह अशी दोन वस्तीगृहे औंध मध्ये आहेत पैकी मुलींच्या वस्तीग्रहाची स्थापना १९८९ साली झाली. दोन्ही व्स्तीग्रहांना शासन मान्यता आहे. नवीनच महिला वस्तीग्रहाची निर्मिती झालेली दिसते.

७.) वाचनालये / ग्रंथालये :

औंध येथे शासकीय व खाजगी असे तीन ग्रंथालये व वाचनालये आहेत. ते खालील प्रमाणे -

अ.) श्री भवानी ग्रंथालय :

श्रीमंत बाळासाहेबांनी संग्रलयातील मौल्यवान वस्तूबरोबरच संग्रलयास उपयुक्त होतील अशा १५००० पुस्तकांचा संग्रह तसेच ३००० जुन्या हस्तलिखित पोथ्या यांचा संग्रह केलेला आहे. अश्या भव्य संग्रहाचे सध्या वेगळे श्री भवानी ग्रंथालय बविले आहे. हे श्री भवानी ग्रंथालय महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यरात आहे. वाचनालयाची तीन माझाली अतिशय सुंदर अशी वास्तू संग्रलयाच्याच आवारात आहे.

ब.) साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय :

मुक्ताई एजुकेशन सोसायटीच्या वतीने औंध येथे साने गुरुजी सार्वजनिक नगर वाचनालयाची स्थापना २९-१०-२००५ रोजी करण्यात आलेली आहे. या वाचनालयात विविध विषयावरील पुस्तकांचा मोठा साठा आहे.

क.) नवयुग सार्वजनिक वाचनालय :

नवयुग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाची स्थापना २५ मे २००९ रोजी झाली. " ज्ञान, संस्कार व प्रबोधनाकडून नावयुगाकडे" या ब्रीदवाक्या प्रमाणे संस्थेची वाटचाल चालू आहे. या वाचनालयात ६०० विविध विषयावरील पुस्तकांचा साठा आहे. सभासद होण्यासाठी नाममात्र फक्त १० रुपये फी आकारली जाते
स्त्रोत : संदर्भ सूची | वैशिष्ट्ये.....
श्री. श्री. विद्यालय, औंध
श्री. श्री. विद्यालय, (बालविकास) औंध
पंडित नेहरू यांची श्री. श्री. विद्यालयस भेट
श्री भवानी बाल विद्या मंदिर
श्री. श्री. विद्यालय, (नवीन इमारत)
ज्युनियर कॉंलेजची जुनी इमारत
महाविद्यालय
आय. टी. आय.
विद्यार्थी वस्तीग्रह
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय
नवयुग सार्वजनिक वाचनालय

१.) श्री यमाई देवी महात्म्य / कथा :

प्राचीन काळी मोराळातीर्थ या निसर्गरम्य शांत परिसरात अनेक भगवतीभक्त, अंब, कृष्ण देवीध्यान करत होते. या परिसरात औंधासूर नावाच्या राक्षसाने भक्तगणांना त्रास देण्यास सुरुवात केली. ज्योतीबांनी या राक्षसाचा बिमोड करण्याचा निश्चय केला पण त्यांच्या शक्ती अपुऱ्या पडू लागल्या तेव्हा भक्तरक्षणासाठी यमाईदेवी मोरावर बसून आली. घनघोर लढाईनंतर देवीने राक्षसाला ठार मारले. औंधासुराला मोक्ष मिळाताना त्याने देवीला आपल्या समोर राहण्याची याचना केली, व परमदयाळू मातेने ती मान्य करत आपल्या मंदिरासमोर त्याला स्थान दिले. आजसुद्धा औंधच्या यमाईदेवीच्या पुढे औंधासुराचे मंदिर आपणास पहावयास मिळते.
यमाईने औंधासुराचा वध केला त्याचवेळी ज्योतीबा, महालक्ष्मी, भैरवभर, कालका इ. शक्ती सैन्याने दंडकारण्यातील अन्य राक्षसांचा वध केला. सर्वत्र देवांचे राज्य आले. महालक्ष्मीने करवीर स्थानी तर ज्योतीबांनी रत्नाचल येथे राज्याभिषेक केला. पण यमाईला याबाबत काहीच माहिती न दिल्याने रुष्ट झालेल्या यमाईदेवीने औंधच्या टेकडीवर ध्यानसाधनेला सुरुवात केली. ज्योतीबांच्या हे लक्षात आल्यावर ज्योतीबा देवीचा रुसवा घालवण्यासाठी औंधास निघाले, संत, महंत व भक्तगण मूळपीठ औंध येथे जमा झाले. त्याला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले. ज्योतीबाच्या प्रार्थनेनंतर यमाई देवीचा राग शांत झाला.
तेव्हापासून चैत्र महिन्यात पौर्णिमेस देवीचा उत्सव साजरा करतात. त्याच प्रमाणे पौष महिन्यात यात्रा भरते. या शिवाय पौष पौर्णिमा, माघ पूर्णिमा, चैत्र पंचमी, नवरात्र अष्टमी, दसरा हे या देवीचे मुख्य दिवस आहेत.

*( विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा ! )

 

 

२.) मंदिरे :

पीठावरील यमाई मंदिर :

येथील यमाईचे मंदीर हे छोट्या टेकडीवर बांधले गेलेले आहे. पण आपण तेथे सायकल किंवा मोटार यांनी पोहोचू शकतो. मंदिराचा वरील भाग खूपच सुंदर असुन तेथे वेगवेगळ्या देवतांची लहान मोठी मंदिरं आहेत. देवीचे हे मंदिर १५०० वर्षापूर्वीचे असून त्याभोवती भक्कम तटबंदी आहे. याच ठिकाणी देवीने कृष्णअंब या भगवती भक्तांना दर्शन दिले असे म्हणतात. महाकाली मंदिरासमोरील नंदी प्रत्यक्ष ज्योतीबांनी स्थापला अशी दंतकथा आहे. मंदिर रचनेत जुन्या स्थापत्यशास्त्राच्या खुना दिसतात. मंदिर चालुक्य काळात बांधले गेले आहे. या मंदिराच्या आवारात दत्तमंदिर पोहऱ्यातील देव, पायऱ्या उतरताना असणारे बनबुवा, मारुती, अंबकृष्ण यांचे दर्शन घडते. आवारातील दत्तमंदिराचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ब्रम्हा, विष्णू , महेश हे स्वयंभू लिंगायतच प्रकट झाले आहेत. मंदिरातील दत्तमूर्ती बैठी आहे. बनबुवांच्या शेजारी मारुतीचे स्थानही असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हातात जपमाळ घेऊन मारुती द्यानस्थ आहे.
मंदिरातील मूर्तीचे वर्णन :
मंदिरात प्रवेश करतानाच उजव्या बाजूला उत्सवमूर्ती आहे. तर समोर यमाई देवीची सुमारे साडे सहा फुटाची सुंदर व भव्य मूर्ती आहे. कमळात बसलेली काळ्यापाषाणातील देवीची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीचे मुख पूर्वेकडे आहे, एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू एक वरद हस्त तर चौथ्या हातात खड्ग त्याच्या खालच्या बाजूला देवीचे मूळपीठ आहे. त्यास स्वयंभू, तांदळा असे म्हणतात. मंदिरास लागून देवीचे शेजघर आहे. त्यात देवीचा पलंग आहे. देवीच्या साड्या, वस्त्रे तेथे ठेवल्या जातात.
मंदिराची माहिती :
यमाई मंदिराच्या मुळ गाभाऱ्याचे बांधकाम हे हेमाडपंती प्रकारचे असून ते इ.स. च्या सातव्या शतकात चाकुक्य राजाच्या काळात बांधले असल्याचे दिसून येते.
१. - १७४५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर -
२. - १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी मंदिराच्या तटाचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे.
३. - १९९४ ते ९६ या कालावधीत यमाई देवस्थानचे तत्कालीन प्रमुख विश्वस्त औंधचे राजेसाहेब (कै.) श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी या मंदिराचा शिखर जीर्णोद्धार केला.
४. - मंदिराच्या परिसरातील दुरुस्ती, रंगरंगोटी व विद्युतरोषणाई आदी कामे औंधचे राजेसाहेब (कै.) भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या कारकिर्दीत झाली
५. - ऑक्टोबर २००० मध्ये राणीसाहेब गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या शिखरावर कलशारोहण करण्यात आहे.
श्री. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी मंदिरात जाण्यासाठी शबादी फारश्या असणाऱ्या ४३२ पायऱ्या बांधून घेतल्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरुवातीस यमाईदेवीच्या पादुका आहेत. तसेच संगमरवरी हत्ती, सिंह, वाघ यांची सुंदर शिल्पे आहेत. त्यानंतर पायऱ्यांच्या शेवटी जय-विजय या भगवान विष्णूच्या द्वारपालांच्या सफेद सुंदर संगमरवरातील सहा फुट उंचीच्या भव्य मूर्ती आहेत. तसेच गरुड, हनुमान, नारद, तुंबर हि प्रत्येक टप्प्यावर दोन्ही बाजूस भव्य संगमरवरी मूर्ती आहेत. आणि पायऱ्यांचा प्रवास करतेवेळी छोटी-छोटी अशी गणपती, शंकर, मारुती यांची मंदिरे पाहवयास मिळतात.
सर्वात वरती प्रवेश द्वारापाशी एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. त्याकाळी खालून पाणी नळाद्वारे डोंगरावर नेवून प्रथमच असी सोय भवानरावांनी केली.
यमाईच्या गाभाऱ्या समोर दगडी भव्य नंदी आहे. या नंदीच्या मागील बाजूस ताटाला एक खिडकी असून सूर्योदयाच्या वेळी या खिडकीतून येणारे सूर्य किरण देवीच्या मुखावर पडतात. या तटबंधीमध्येच आसलेल्या शिल्पांचे उत्कृष्ठ नमुने म्हणून गणले गेलेले दगडी फिरते खांब आहेत. जे लहान मुले सुध्दा सहज फिरवू शकतात. याशिवाय याप्रचंड ताटामध्ये गणपती, विष्णू, लक्ष्मी, मारुती, सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. या तटबंधीवर जाण्यास पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. या पायऱ्याशेजारीच दत्त मंदिर आहे. पायऱ्यावरून वर चढून गेल्यानंतर भक्कम तटबंदीवरून चारी दिशांना फिरता येते व संपूर्ण औंधगाव आणि आसपासचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.

गावातील यमाई मंदिरे :

हे मंदिर श्रीमंत श्रीनिवासराव पंडित पंतप्रतिनिधी यांनी सन १८८२ ते १९०१ या काळात बधून घेतले आहे. गाव देवीचे भव्य व आकर्षक मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप देखील भव्य असून या सभामंडपात श्रीमंत बाळासाहेब यांनी काढलेली 'रामायण', 'महाभारत', 'देवीसप्तशती', आणि शिवचरित्र या विषयावरील भव्य आकर्षक अशी तैलचित्रे आहेत. याशिवाय १० ते १२ फुट उंचीची झुंबरे आहेत, प्रत्येक झुंबर हा उत्कृष्ठ कलाकृतीचा नमुना आहे. हा सभामंडप श्रीमंत श्री श्रीनिवासराव परशुराम पंडित पंतप्रतिनिधी यांच्या काळात चालू राहून श्रीमंत श्री भवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी यांच्या काळात इ.स. १९१० साली पूर्ण झाला. याचे काम श्री किर्लोस्कर बंधू यांनी केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी उजव्या बाजूस गणपतीचे छोटस मंदिर आहे तर डाव्या बाजूस श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांची संगमरवरी मूर्ती असलेले छोटे मंदिर आहे. मधोमध डोक्यावरती १७४४ सालची भव्य घंटा आहे. मंदिरातील गाभाऱ्यात देवीची मुळमूर्ती व उत्सव मूर्ती आहे तर खाली भुयारात महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या समोर काळ्या पाषाणातील मोठा नंदी आहे. बाजूला राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आहे.
औंधासूर मंदिर : यमाईमंदिराच्या समोर युद्धामध्ये औंधासूराचे राहिलेले शीर स्वरूपी छोटी मूर्ती व छोटे मंदिर असून लोक यमाईच्या दर्शानंतर औंधासूराचे दर्शन घेवून धूप आरती करतात.

तुकाई मंदिर :

गावातील तळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या तुकाई मंदिरा संबंधी एक दंतकथा सांगितली जाते. दंडकारण्यात वनवास भोगत असताना सीतेचे रावणाने हरण केले. सीतेच्या विरहाने दु:खी कष्टी झालेले राम, सीतेचा सर्वत्र शोध घेत औंध परिसरात पोहोचले. व्याकूळ श्रीरामांना पाहून यमाईने श्रीरामांनची परीक्षा घेण्याचे ठरवले. यमाई देवीने सीतेचे रूप धारण केले व श्रीरामांन समोर गेली. श्रीरामांना स्वत:हा सीता असल्याचे सांगितले. पण अंतरज्ञानी श्रीरामांनी यमाईदेवीला म्हणजेच आपल्या गेल्या जन्मातील मातेला ओळखले. त्यांनी यमाईदेवीकडे पाहून सहजच उदगार काढले, " तू का आई अशी आलीस ?" तेव्हा यमाईने प्रसन्न होवून प्रत्यक्ष दर्शन दिले व विजयीभव असा आशिर्वाद दिला. तेव्हापासून यमाईदेवी ' तुकाई ' या नावानेहि ओळखली जावू लागली. जेथे यमाईने श्रीरामांना दर्शन दिले तेथे हे मंदिर उभे आहे.

मोकळाई मंदिर :

औंधासुराला यमाईदेवीने घनघोर युद्धानंतर यमसदनी धाडले. या लढाईत यमाईदेवीला देखील भरपूर जखमा झाल्या. या जखमांची दाहकता कमी करण्यासाठी देवीने औंध येथील तळ्यात अंघोळ केली. स्नान करताना देवीने आपले केस मोकळे सोडले होते म्हणून देवीला ' मुक्तकेसरी ' किंवा ' मोकळाई ' म्हणून ओळखले जाते. तळ्याच्या पश्चिम या दिशेला जवळच मोकळाईचे मंदिर आहे. या तळ्यातील पाणी भाविकांसाठी तीर्थ ठरले आहे. भाविक या तळ्यात अंघोळ करतात. त्यानंतर मोकळाईचे दर्शन घेतात. त्यामुळे शरीरावरील सर्व व्याधी नाहीशा होतात आशी त्यांची श्रद्धा आहे. मोकळाईचे मंदिर फार पुरातन व संपूर्ण दगडी आहे.

ज्योतीबाचं मंदिर :

ज्योतीबाच मंदिर औंधच्या उत्तर दिशेला एका टेकडीवर उभारले आहे ज्योतीबाच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. यमाईदेवीचा रुसवा घालवण्यास ज्योतीबा औंधास येण्यास निघाले. संत, महंत व भक्तगण मूळपीठ औंध येथे जमले. वाद्ये वाजवित, गुलाल उधळीत सार्वजन औंधपिठावर पोहोचले ज्योतीबा समिप येताच यमाईने दार लाऊन घेतले. पण ज्योतीबांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने व प्रभावी बोलण्याने देवीची समजूत घातली. उदार मनाने ज्योतीबाने माफी मागीतली. देवीनेही त्यांना माफ करत प्रसन्न मनाने त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगावेळी ज्योतीबा, भक्तगण, साधुसंत यांची भगवती भक्तांनी सोय केली. भगवती भक्तांनी सर्वाना आंबिल देवून सर्वांचा श्रमपरिहार केला. या सेवेवर ज्योतीबा प्रसन्न झाले व त्यांना वरदान दिले " आपण आंबिले नावाने प्रसिद्ध व्हाल. " या आशिर्वादाबरोबर आंबिले नाव अजरामर झाले.
दरवर्षी ज्योतीबा औंधपीठावर येवून चैत्रात देवीचा उत्सव साजरा करत . देवी एकदा ज्योतीबांना म्हणाली, " आपण दरवर्षी औंधला येण्याचे श्रम घेता एक वर्षी मी आपल्याकडे येते. आपले राज्य कसे आहे हे तरी पाहूया. " ज्योतीबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे यमाई रत्नाचलच्या चंपक बनात प्रकट झाली. ज्योतीबांच्या रत्नाचल डोंगरावर यमाईचे मंदिर आहे. या भेटीप्रीत्यर्थ तेथे चैत्रात मोठी यात्रा साजरी केली जाते.

अन्य मंदिरे :

मोराई, हरणाई, राम, विठ्ठल-रुखमाई, विष्णू, हरिहरेश्वर, महादेव, एकविरा, राधास्वामी, नरसिंह, केदारेश्वर, अनुसया, दत्त, हनुमान, स्वामी समर्थ आशी अनेक मंदिरे औंधमध्ये पहावयास मिळतात.

३. अन्य श्रद्धा स्थळे :

 

अ. औंधची दीपमाळ :

या श्रीयामाईदेवीच्या समोर असणारी दीपमाळ सुमारे ६५ फुट उंचीची असून ती इतकी सुंदर आहे कि, अफ्झुलखानासारख्या विध्वंसकालाहि ती नाश करू नये, असें वाटल्याचा बाँबे गॅझेटियरमध्यें उल्लेख आहे. छबिन्याच्या दिवशी सायंकाळी पालकी निघण्याच्या वेळी श्री यमाई मंदिराच्या परिसरात असणारी अति भव्य महाराष्ट्रातील सर्वात उंच ( ६५ फुट ) आकर्षक दगडी दीपमाळ प्रज्वलित केली जाते. या दीपमाळीवर पाच घेर आहेत, सर्वात खालचा मोठा व वरचे लहानहोत गेले आहेत त्यामुळे निमुळता आकार प्राप्त झाला आले. दिप्मालीवर पायटे नक्षीदार असून त्यांची रचना अशी आहे कि आधाराशिवाय सहज वर चढता येते. रणदिवे ह्या लोकांकडे ती प्रज्वलित करण्याचा मान आहे.

ब. औंधचे तळे :

देवीने औंधासुराचा वध केल्यानंतर देवीला जखमांच्या दाहकतेने ग्रासलेले होते. तेव्हा हि दाहकता कमी करण्यासाठी देवीने या तळ्यात स्नान केले. भाविकांसाठी या तळ्याचे महत्व तीर्थाप्रमाणे आहे. पौराणिक भाग सोडला तर औंधमध्ये पद्माळें, नागाळें व विशाळें अशी तीन तळी होती पैकी विशाळें हे तळे बुजले आहे तर इतर दोन तळी सध्या वापरत आहेत हि तळी कोणी निर्माण केली या बद्दल अचूक माहिती नाही पण आटपाडीतील एका नागोजी सावकाराने बांधली असे म्हणतात म्हणूनच नागाळें असे नाव आहे. ह्या तळ्याच्या ऐतहासिक खुणा मात्र आहेत मोराल्यातील मोराळें व यमाईच्या डोंगरात अजून एक तळे आहे त्यास दुर्गाळें अशी पाच तळे असल्याच्या खुणा सापडतात. पैकी गावातील वापरात असणारे तळे म्हणजे नागाळें या तळ्याचा आकार चौरसाकृती असून त्याला त्याच्या वापराप्रमाणे पाच घाट आहेत ते पुढील प्रमाणे -
श्री यमाई देवी घाट, श्री मोकळाई देवी घाट, श्री तुकाई देवी घाट, पैहलवान घाट, श्रीनिवास घाट असे पाच घाट आहेत.
या तळ्यातील पाण्याने आघोळ केल्याने खरुज, नायटा नाहीसा होतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार या तळ्यातील पाणी झिरपणाऱ्या खडकांमध्ये काही खडक गंधाचे असल्याने हा प्रभाव पडतो. पण श्रद्धा म्हणा किंवा विज्ञान तरी या तळ्याचे महत्व कमी होत नाही.

क. मंदिरातील फिरते खांब :

यमाईच्या मंदिरासमोर नंदीच्या पाठीमागे तटावर एक खिडकी असून सूर्योदयाच्या वेळी या खिडकीतून येणारे सूर्य किरण देवीच्या मुखावर पडतात. या तटबंधीमध्येच आसलेल्या शिल्पांचे उत्कृष्ठ नमुने म्हणून गणले गेलेले दगडी फिरते खांब आहेत. जे लहान मुले सुध्दा सहज फिरवू शकतात. या मंदिरातील हे खांब शिल्पकलेच्या रचनेचा अत्यंत रेखीव व कलात्मक नमुना आहे. या खांबाची रचना महत्वपूर्णरित्या फिरती ठेवण्यात आली आहे. श्रद्धा अशी आहे कि हा खांब फिरवणारा व्यक्ती आयुष्यातील सर्व कोडी सोडवतो. कित्येक भाविक हा खांब फिरवताना आढळून येतात.

ड. मनकवडी नाणी :

यमाईच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला बरेच भाविक नाणी चीटकवून पाहतात. ज्याची चीटकली त्याचे मनोरथ पूर्ण होते. व ज्याचे मनोरथ पूर्ण होण्यात अडथळे येतात त्याची नाणी खाली कोसळतात.
या गोष्टीकडे कोणी श्रद्धा म्हणून पाहील तर कुणी अंधश्रद्धा पण मंदिराचे ऐतिहासिक महत्व, रचना, कला मात्र सर्वांनाच भावेल मनोरथ असो, नसो, कोडी सुटतील, न सुटतील पण तुम्हाला नाणी चीटकवण्याचा व खांब फिरवून पाहण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही.
स्त्रोत : संदर्भ सूची | वैशिष्ट्ये.....
श्री यमाई देवी
मुळपीठ
पादुका शेजारी
मुळपीठ मंदिर
मुळपीठ मंदिर
गावातील यमाई मंदिर
तुकाई मंदिर
मोकळाई मंदिर
ज्योतीबाचं मंदिर
राममंदिर
दीपमाळ
औंधचे तळे
मंदिरातील फिरते खांब
मनकवडी नाणी

एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ ... औंध

 

कुंकम ..... सौभाग्याचं प्रतिक म्हणून नेहमीच माथ्यावर विराजमान असतं,
युद्धावर यातना विजयाची निशानी म्हणून नामाच्या स्वरुपात विराला लावलं जात.
शुभ प्रसंगी मानाचा शुभशकून म्हणून लावला जातो मंदिरात तर याच नसणं परमेश्वराला अधूरं वाटतं,
त्याच ठिकाण मात्र निश्चित असत, उजळ माथ्यावर तसच.....
आमच्या औंधची कीर्ती, ओळख विविध रुपात असेल पण स्थानमात्र साताऱ्याच्या मध्यावर आहे.
अगदी मस्तकावर विराजमान कुंकूमाप्रमाणे.....
औंध .....एक पर्यटन स्थळ

 

 

पर्यटनाचा एक उत्कुष्ट नमुना ... श्री भवानी वस्तूसंग्रहालय :

औंध संस्थानाचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे स्वत: उत्तम चित्रकार व कलाप्रेमी होते. युरोपात फिरत असताना त्यांनी अनेक चित्रे व कलाकृती खरेदी केल्या. भारतीय चित्रकारांची चित्रे हि ते विकत घेत असत. त्याच बरोबर कलाकारांकडून चित्रे अथवा पुतळे बनवून घेत व त्यांना यथोचित मोबदला देवून सन्मानीत करत. यामुळे महाराजांकडे मोठा कलासंग्रहालय निर्माण झाला. हा कलासंग्रह जनतेला पाहता यावा, लोकांना हा कालासंग्रह पाहून कलेची प्रेरणा मिळावी व शैक्षणिकदृष्टी साध्य व्हावी या दुहेरी हेतूने १९३७ - १९३८ या काळात श्री भवानी चित्र संग्रहालयाची इमारत उभारली व हे संग्रहालय जनतेला खुले केले.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कलेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे या हेतूने बाळासाहेबांनी हा कलासंग्रह संग्रहाच्या इमारतीसह १९५२ मध्ये महाराष्ट्रास स्पुर्त केला.
औंध येथील भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे कलेचे व विशेषत: रंगचित्राचे संग्रहालय आहे. केवळ चित्रकलेचे असे हे कदाचित भारतातील एकमेव संग्रहालय आहे.

*संग्रहालयाचा सचित्र परिचय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

पवनचक्की :

सातारा जिल्हा हा पवनचक्कींचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. या महतीला साजेसा सर्व परिसर औंधच्या आसपासचा आहे म्हणजे गावात प्रवेश करताच चारी बाजूस असणाऱ्या शेकडो पवनचक्क्या आपले लक्ष वेधून घेतात. औंध परिसरात असणाऱ्या नाथाचा डोंगर, हरणाई डोंगर गणेशखिंड डोंगर, जायगाव डोंगर, खबालवाडी डोंगर हे सर्व डोंगर पंचाक्किंमुळे शुशोभित झाले आहेत. येथे अखंड वीजनिर्मिती होते शिवाय स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्द झाला आहे.

"बेडकी" दगड :

मुलपिठाच्या पहिल्या टप्प्यावर डोंगराचा एक निमुळता भाग बाहेर आला आहे व त्याच्या टोकावर एक मोठा गोल बेडकीच्या आकारात असलेला दगड अर्धा डोंगरावर तर अर्धा अधांतरी आहे. या दगडा पर्यंत सहज पोहचता येते व त्यावरती चढून बसता येते. सायंकाळच्या सुमारास खूप जोराची हवा येथे येत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोक फिरण्यासाठी येथे जातात.
विशेष करून लहान बालके, शालेय विध्यार्थी यांच्यासाठी हे एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | वैशिष्ट्ये.....
औंधचा देखावा
औंधचे भवानी संग्रहालय
पवनचक्की
"बेडकी" दगड

कार्यरत संस्था :

औंधच्या इमारतीचा भक्कम पाया आदिमायेच्या अध्यात्मिक शक्तीवर उभारला गेला आहे. ज्याच्या भिंती राजेशाहीने घडल्या आणि कळस तेथील लोकशाही आहे. विजयाची पताका आहे. ती तिथल्या कार्यरत संस्थांच्या हातात......

१.) राजघराणे :

औंध घरण्याची सुरुवात हि यमाईचा वरदहस्त लाभलेल्या ब्रह्मर्षी त्र्यंबक पंतांपासून होते. शूरवीर परशुरामांना पंतप्रतिनिधी पद मिळाल्यानंतर औंधला एक प्रकारचा राजेशाही वारसा सुरु झाला. त्यातून येणाऱ्या प्रत्येक पिढीतून औंधची भरभराट होत गेली.
पण खरी लोकशाही बहरली ती औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या काळातच. त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख दिवसेंदिवस बहारलेलाच दिसतो. ' एक मुलखा वेगळा राजा' या उपाधीने सन्मानित केले गेले. स्वतंत्र्यानंतर भारतात लोकशाही स्थापन झाली पण औंध मध्ये ती आधीच अस्तित्वात होती. घटनेच्या तरतुदी नुसार औंध राजधानी हे औंध खेडे बनले. पुढील पिढ्याही सामान्य नागरिक झाल्या. भवानरावांचे चिरंजीव बॅ. आप्पासाहेब पंत यांनी औंध संग्रलायला चिरकाल जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तिबेटीयन वस्तूंची भर घालून हे संग्रालय शासनास सपुर्द केले. आर्ध्या शतकाचा काळ लोटल्यानंतर आज पुन्हा एकदा औंध घराण्याच्या स्नुषा श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी साहेब यांनी पुन्हा एकदा औंध संग्रालय व औंध गावाला नव्या रुपात जगासमोर आणून त्यावर एक सोनेरी लेप दिला आहे.

*( विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा ! )

 

 

२.) ग्रामपंचायत :

भारतातील पहिली ग्रामपंचायत १९३९ साली औंध मध्ये स्थापन झाली. तो लोकशाहीचा प्रयोग म्हणून म्हणून प्रसिध्द आहे. या प्रयोगाच्या ख्यातीची दाद पं. नेहरू यांनी औंधला भेट देवून घेतली होती. या प्रयोग शिलतेचे निर्माण केकेले प्रयोग मात्र चिरकाल एक आदर्श संकल्पना म्हणून उभे राहिले.
१. शेतसारा मोजण्याची 'महालवारी' पद्धत सर्व प्रथम औंध मध्येच सुरु झाली.
२. औंधमध्ये भूमिअंतर्गत सांडपाणी निचरा होऊन जाण्याची सोय त्याकाळी केली गेली होती ज्यामुळे साथीचे रोग जरी आले तरी त्यांची तीव्रता औंधमध्ये कमी असे.
३. औंध ग्रामपंचायतीला संलग्न असलेली शासकीय कार्यालये -
   अ. ग्रामपंचायत कार्यालय
   ब. मुलकी कार्यालय
   क. पोलीस स्टेशन
   ड. प्राथमिक आरोग्यकेंद्र
   इ. मंडल कृषी कार्यालय
   ई. महाराष्ट्र राज्य - विद्युत महामंडळ उपविभाग
   उ. सार्वजनिक बांधकाम शाखा
   ऊ. जिल्हापरिषद निवास स्थान

३.) सामाजिक संस्था :

औंध वेटलिंग ट्रस्ट : औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी यांचे कार्य इतिहासाने दाखल घेण्यासारखे जसे होते तसे ते ब्रिटिशांना सुद्धा प्रेरित करणारे होते. राल्फ वेटलिंग हे त्यापैकीच एक त्यांनी बाळासाहेबांचा गुण गौरव केला व पुढे जाऊन औंध वेटलिंग ट्रस्टची निर्मिती केली सध्या त्याचे प्रशासक श्री आप्पा पुराणिक असून या संस्थेमार्फत पुढील कामे केली आहेत. -
१. चित्रकलेत पारंगत विध्यार्थांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात.
२. लहान मुलांना विविध पुस्तकांचे व खेळण्याचे वाटप केला जातो.
३. शालेय मुला-मुलींना मोफत शालेय गणवेश दिला जातो.
४. शाळेच्या विकासासाठी प्रयोगशाळेतील साहित्यांची खरेदी करण्यासाठी १९९६ साली देणगी देण्यात आली.
५. भवानी वस्तू व चित्र संग्रलायातील वस्तूंचे जतन करण्यासाठी व वाचनालयातील पुस्तकांचे संरक्षण करण्यासाठी देणगी वेळोवेळी देण्यात आली.
६. सन १९९२ पासून यु.के. तील विध्यार्थी औंधला भेट देतात व त्यांना इंग्रजी शिक्षणाचे धडे देतात.
७. मुलांचे व मुलींचे वस्तीग्रह अद्यावत कारीण्याकरिता या संस्थेने आर्थिक मद्दत दिली आहे.
८. या शिवाय औंध मधील संगीत प्रतिष्ठान व गरीब गरजू लोकांना, जसे हमाल, सफाई कामगार, मजूर यांना या संथेने मद्दत केलेली आहे.

राजवैभव प्रतिष्ठान : सामाजिक बांधीलकीने प्रेरित होऊन श्री. दत्तात्रय जगदाळे यांनी २००४ साली 'राजवैभव प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत " श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी कलाभूषण " हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी-
अ.१३ मार्च २००५ - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
ब. ०७ एप्रिल २००७ - खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर
क. २९ जानेवारी २००९ - जेष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे

या व्यतिरिक्त मेघदूत, मुक्ताई, शिवगंगा यासारख्या विविध संस्था औंध मध्ये कार्यरत असून प्रत्येकजन आपली समाजाप्रती असणारी बांधिलकी जपू पाहत आहेत.

४.) पतसंस्था :

शिवगंगा : शिवगंगा ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. औंधची स्थापना २००१-२००२ साली झाली. " बिना सहकार नाही उद्धार !" हाच या संथेच पाया आहे.
यशोदीप : यशोदीप ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. मायणी , शाखा- औंध हि पतसंस्था सुध्दा गरजूंना आर्थिक मद्दत देण्यास नेहमी सज्ज असते.

५.) राजकीय पक्ष व कार्ये :

सत्ताधारी राजकीय पक्ष : राजघराणे हे भारतीय स्वातंत्र्यानंतर अस्थित्वात राहिले नाही तरी कालानुरूप त्यामध्ये बदल झाले व स्वतंत्र्य भारतातील पक्ष पद्धती नुसार राज घराण्याच्या स्नुषा श्रीमती गायत्रीदेवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वीकार केला व राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आजचा गावचा विकास त्यांनी घडवून आणला.
इतर राजकीय पक्ष : सध्या औंधमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत असला तरी काँग्रेस, भाजप, मनसे इ. पक्षहि आपापल्या पातळीवर कार्यरत आहेत.
स्त्रोत : संदर्भ सूची | वैशिष्ट्ये.....
राजवाडा
राजवाडा
१ ली ग्रामपंचायत
ग्रामपंचायत
महाराष्ट्र राज्य - म. रा. वि. म. उपविभाग
पोलीस स्टेशन
प्राथमिक आरोग्यकेंद्र
औंध संस्थान काळात कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी दर शनिवारी औंध येथे बैल बाजार सुरु केला कारण मंगळवार हा दिवस देवीचावार असल्याने दर मंगळवारी औंधला आसपासच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असल्याने या दिवशी पाजीपाला व इतर व्यवसायांचा बाजार भारत असे लोकांच्या सोयीसाठी मंगळवारच्या बाजाराचे हे वैशिष्ट आहे तर शनिवारी बैल, शेळ्या, मैशी वगेरे इत्यादी जनावरांचा बाजार भारत असे हे बाजार तालुक्यातील पहिले बाजार ठरले आहेत. संस्थान विलीनानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी म्हणजे १९६३ मध्ये सरकारी कायद्या प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती वडूज येथे झाली व हे बाजार या समितीच्या अधिकाराखाली काम करू लागले त्यामध्ये ग्रामपंचायत आधी काम पाहत होती व नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती काम पाहते फरक असकी गावोगावी बाजारांची मागणी होऊ लागल्याने त्याप्रमाणे परवानगी देण्यात येऊ लागली बाजारांचे प्रमाण वाढले परिणामी औंध येथील जनावरांच्या बाजारात प्राण्याचे प्रमाण घटले गेल्याने शनिवारचा बाजार बंध झाला व मंगळवारच्या बाजाराशी जोडला गेला.

बाजार :

औंध येथे दर मंगळवारी धान्याचा व शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो. सदर बाजारचे दिवशीं आसपासचे खेड्यांतून सर्व प्रकारची धान्यें, भाजीपाला, फळफळाव, लोणी वगैरे सर्व जिन्नस विक्रीकरितां येतात. दूरदूरचे व्यापारी कापड, मसाल्याचे जिन्नस घेऊन येतात. सदर दिवशीं जनावरांची खरेदी विक्रीही बर्याच प्रमाणावर होत असते.

पारंपारिक :

औंध येथे काही ठराविक समाजातील लोक आपला पारंपारिक व्यवसाय करतात . उदा .
१. डोंबारी समाज : या समाजातील लोक विविध ग्रहपयोगी वस्तू बनवतात. कळकाच्या लकडा पासून खुराडी, सीड्या इ. अन्य वेग वेगळ्या लाकडांपासून पोळपाट लाटणे नक्षीदार बेलन वैगेरे तर लहान मुलांसाठी खेळणी, आणि हार्मोनियम पेटी, तबला अश्या असंख्य वस्तू बनविल्या जातात.
वास्तविक हे लोक देवीच्या मंदिरात विविध उस्तवात नाच-गायनाच्या कार्यक्रमासाठी आहेत. शिवाय लोकनृत्ये, तमासे हे यांचे प्राविण्य असलेले क्षेत्र आहे.
२. मांग समाज : या समाजातील लोक केरसुनी, हासूड वैगेरे ग्रहपयोगी वस्तू बनिवितात. देवीच्या उत्सवात कटी धरण्याचे मानकरी आहेत.
३. महार समाज : या समाजातील लोक देवीच्या उत्सवात हलगी सारकी पारंपारिक वाद्ये वाजीवतात आणि पौष्य यात्रेमध्ये दीपमाळ पेटवण्याचा मन यांच्याकडे आहे.
४. माळी समाज : फुलाचा व्यवसाय करतात.
५. कुंभार समाज : मातीच्या चुली, गाडगी, मठका, दिवे, गणपती, मातीची बैले वैगेरे बनविण्याची कामे करतात.
६. लोहार, सुतार, परीट या सारख्या समजातील लोक आपोआपल्या जातीतील पारंपारिक व्यवसाय आज देखील करीत आहेत.

शेती :

शेती हा सर्वात प्रमुख व्यवसाय आहे. येथील मुख्य पिकें-ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, भुईमुग, मिरची ही आहेत. थोडा ऊसही होतो. या पिकांपैकी फार थोडा माल बाहेर जातो.
पेप्सी हा विशेष बटाट्याचे उत्पन्न आजकाल मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.

इनामी :

भुई, घडशी, नगार्जी, दिवटे, गुरव या सारख्या समाजांना इनामी वतने मिळाली आहेत हे लोक देवीला आपली सेवा पुरवितात.
स्त्रोत : संदर्भ सूची | वैशिष्ट्ये.....
बाजार
बाजार
पारंपारिक व्यवसाय
पारंपारिक व्यवसाय