औंध एक छोटसं खेडं आहे निसर्गाच्या कुशीत लपलेलं.
शेतं, नदी, डोंगर, हवा, नित्याचीच आहेत. पण वेगळ पण आहे ते स्पर्शात
जसं - श्रावणाची एक जलधारा पृथ्वीवरती पडते आणि मातीतून मंद सुगंध दरवळतो
तसाचं बाळासाहेब महाराजांचा स्पर्श या मातीला झाला आनं कर्तुत्वाचा, कलेचा सुगंध
काही काळ दरवळून गेला त्याचं मातीचा हा आढावा.
भौगोलिक : औंध . . . सध्याचं एक गोजिरवाण रूपं !

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

स्त्रोत : संदर्भांच्या आधारे औंध.इन्फो व्दारे बनविण्यात आला आहे. ( सदोष असण्याची शक्यता ) | भौगोलिक.....
औंध गावंचा नकाशा
गुगल जाहिरात

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

स्त्रोत : संदर्भांच्या आधारे औंध.इन्फो व्दारे बनविण्यात आला आहे. ( सदोष असण्याची शक्यता ) | भौगोलिक.....
औंध संस्थानचा नकाशा
गुगल जाहिरात

सामान्य वर्णन :

कोणत्याही प्रांताची भौगोलिक माहिती देतांना त्या प्रांताच्या मर्यादा पहिल्याने सांगून तो प्रांत अमुक अमुक मुलखाने वेष्टित आहे, हें निश्चित करितात; परंतु औंध संस्थानच्या बाबतींत असें करितां येत नाहीं. कारण संस्थानच्या ताब्यांतील मुलुख एके ठिकाणीं नसून, सातारा, सोलापूर व विजापूर या तीन जिल्ह्यांस लागून इतरस्तत: विखुरलेला आहे.औंध संस्थानचें एकंदर क्षेत्र ५०१ चौरस मैल असून संस्थानांत एकंदर ७२ गांवें आहेत. पण तीं अशीं दूरदूर पसरलेलीं असल्याने राज्यव्ववस्थेच्या सोयीसाठीं त्यांचे औंध, कुंडल, आटपाडी आणि गुणदाळ असें चार तालुके केले आहेत. या ४ तालुक्यांपैकीं एक आटपाडी तालुका मात्र असा आहे कीं, त्यांतील ३३ गांवें एक गटाने सलग मुलुखांत आहेत. बाकीं तिन्ही तालुक्यांतील गांवें अशीं सलग नाहींत; याकरितां प्रत्येक तालुक्याचें व त्यांतील गांवचें वर्णन निराळें करणे भाग आहे.

औंध तालुका :

या तालुक्यांत १ औंध, २ पारगांव, ३ चिखलहोळ, ४ किन्हई, ५ माहुली, ६ बेलसवडें, ७ व्याहापूर, आणि ८ कोर्टी भोसलेवाडीसह, अशीं आठ गांवें आहेत.

औंध :

१ हें गांव संस्थानचे राजधानीचें गांव असून
२ तें साताऱ्याचे आग्नेयेस सुमारें २४ मैलांवर आहे.
३ हें गांव समुद्रसपाटीपासून २८०० फूट उंचीवर असून
४ अक्षांश १९° व रेखांश १७° असल्याने
५ येथील हवा समशीतोष्ण आहे.
६ दरसाल पावसाचें प्रमाण सरासरीने २५ ते ३५ इंच असतें.
७ जमीन बहुतेक माळरानाची असल्याने पुष्कळ पाण्यावाचून चांगली पिकत नाही.

उत्पन्न :

येथील मुख्य पिकें-ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, भुईमुग, मिरची ही आहेत. थोडा ऊसही होतो. औंध गांवा-खाली गणेशवाडी व दुसरी करंड्याची वाडी अशा दोन वाड्या आहेत; त्यापैकी करंड्याची वाडीत बहुतेक रजपुत लोकांची वस्ती आहे. ह्या दोन वाड्याखाली असलेली जमीन औंधपेक्षां अंमळ अधिक सुपीक आहे.

निर्यात :

वरील पिकांपैकी फार थोडा माल बाहेर जातो.

आयात:

बाहेरून औंध येथे पुष्कळ माल येतो. त्यांत मुख्यत्वेंकरून तांदूळ, मीठ, साखर, चहा, गूळ, हळद, नारळ, तंबाखू, गहू, ज्वारी, हरबरा, तूर, मसाला, तेल, लोणी, तूप, फळफळावळ, भाजीपाला, रॉकेल, पेट्रोल, स्टेशनरी, कापड, इत्यादि. औंधच्या रहिवाशांना औंधजवळील खेडीं दुध, लोणी, कडबा, भाजी, व धान्य विकून बराच पैसा मिळवितात. या राजधानीच्या गांवाला लागूनच औंध संस्थांची कांहीं गांवें असतीं तर हा फायदा संस्थानच्याच रयतेस मिळाला असता.

उधोगधंदे :

खुद्द औंधास मोठे कारखाने नाहीत; तरी रा परशुराम कृष्ण सुतार यांचे एक वर्कशॉप चांगल्या प्रकारचें आहे. येथें लोखंडी नांगर, पाण्याचे रहाट, लाकडी फर्निचर वगैरे माल तयार होतो. आणि त्यांनी एक धान्य दळण्याची गिरणीही ठेवली आहे. औंध संस्थांचे अधिपति श्रीमंत बाळासाहेब यांच्या खास नजरेखालीं दगडाच्या मूर्तिं व पुतळे घडविण्याचा कारखाना, तीन रंगाचीं चित्रें छापण्याचा कारखाना, असे दोन कारखाने आहेत. या दोन्ही कारखान्यांत काम इतकें कौशल्यपूर्ण होत असतें कीं, दूर दूर प्रांतांतून अनेक मागण्या येत असतात. यामध्यें विध्यार्थीही शिकवून तयार केले जातात. हत्यारें दुरुस्त करणें, सोनें, चांदी, पितळ यांचें ओतकाम करणें वगैरे काम करणारे कारंजकर व तांबट सरकारचे पदरीं आहेत. त्यांचाहि धंदा चांगला चालतो औंध येथील सरकारी तुरुंगात सतरंज्या व गालिचे तयार होतात आणि त्र्यंबक - कला - भुवनांत लोकरीचें व सुताचें कापड हातमागावर तयार होतें. या लहानश्या गांवांत दोन छापखाने आहेत. पैकी एक सरकारी असून त्यांत औंध संस्थांचे गॅझेट आणि सरकारांस लागणारे नमुने वगैरे कामें होतात. दुसरा भारतमुद्रणालय नावाचा छापखाना स्वाध्याय - मंडळाचा आहे. त्यांत धर्म, भगवद्गीता हीं हिंदी आणि पुरुषार्थ हें मराठी अशी मासिकें व अनेक इतर कामें छापली जातात.

प्रेक्षणीय स्थळे. :

१ श्रीमूळपीठदेवी :

औंध हें श्रीयमाईदेवीचें स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ही देवी या गांवाच्या नैऋत्येस पाव मैलावर एका डोंगरावर आहे. या डोंगरावरील स्थानास 'मूळपीठ' अशी संज्ञा आहे. या स्थानाची उंची समुद्रसपाटी पासून ३,३०० फुट आहे. देवळास सभोवती तट आहे. आणि हें स्थान २०-२५ मैलावरूनहि शिवलिंगाप्रमाणे दृग्गोचर होतें. तटावरील गच्चीवरून सभोवतालचा देखावा लांबवर दिसतो. या डोंगरावर देवीच्या दर्शनास चढून जाण्यास आयास पडूं नयेत म्हणून हल्लींच्या श्रीमंत महाराजांनी पायथ्यापासून पायऱ्या बांधिल्या आहेत.

२ श्रीयमाईदेवीचें मंदिर :

याच देवीचें गांवांतहि एक देऊळ आहे. त्या देवळाचा जीर्नोद्धार कै. श्रीश्रंत राजर्षि श्रीनिवासराव प्रतिनिधि यांनी करून उत्तम शिखर आणि विस्तीर्ण मंडप बांधिला आहे. श्रीमंत बाळासाहेब यांनी आपलीं भव्य चित्रें, विजेच्या दिव्यांचीं जुंबरें, ग्वाल्हेरपॉंटरी वर्क्सच्या टाईल्सची फरशी आणि उत्तम तैलरंग यांच्या योगें हें मंदिर अत्यंत सुशोभित केलें आहे. या मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर दोन अंगांस पुस्तकसंग्रह, तिसऱ्या अंगास जुन्या चित्रांचा संग्रह आणि चौथ्या अंगास म्युझियम आहे.

३ औंधची दीपमाला :

या श्रीयामाईदेवीच्या समोर असणारी दीपमाळ सुमारे ६५ फुट उंचीची असून ती इतकी सुंदर आहे कि, अफ्झुलखानासारख्या विध्वंसकालाहि ती नाश करू नये, असें वाटल्याचा बाँबे गॅझेटियरमध्यें उल्लेख आहे.

४ श्रीरामपंचवटी :

गांवाच्या नैऋत्येस कै. श्रीमंत मातुश्री सगुणाबाईसाहेब यांनी बांधलेलें श्रीराममंदिर हि एक रम्य जागा आहे.
औंध गांव चित्रकलेचें माहेरघर आहे. श्रीमंत बाळासाहेब स्वत: उत्तम चित्रकार असून त्यांनी अनेक चित्रकारांना आश्रय देऊन, त्यांच्या कलाकृती संग्रहित केल्या आहेत. औंधच्या राजवाड्यांत चित्रें नाहीत असें एकही दालन सांपडणार नाही. अजिंठ्यांतील चित्रविभागाकरिता एक स्वतंत्र दालन आहे. चंदन, हस्तिदंत,कानडी, सोने, पोवळे, नीळ, माणिक, ओपाल, स्फटिक इत्यादी नानाप्रकारच्या मूल्यवान वस्तूंवर कलाकुसरीचीं कामें केलेलीं येथे पहावयास सांपडतात. त्याचप्रमाणे श्रीमंत बाळासाहेब यांची आर्ट लायब्ररीहि अद्वितीय आहे. परस्थ पाहुण्यांना वाडा पहाण्यास श्रीमंत बाळासाहेब मोठ्या आनंदाने परवानगी देतात; म्हणून औंधांतील प्रेक्षणीय स्थलांत राजवाड्यांतील चित्रसंग्रह हाच मुख्य भाग आहे.

रस्ता :

औंधास येण्याचा मुख्य मार्ग मद्रास अँड सदर्न मराठा रेल्वेच्या रहिमतपूर स्टेशनपासून पूर्वेस जाणारा सातारा - तंसागांव रस्ता हा होय. या रस्त्याच्या २२ व्या मैलापासून औंध संस्थानने ३ मैल सडक आपल्या खर्चाने करून दुरुस्त ठेविली आहे. दुसरा मार्ग पुसेसावळी वडूज रस्त्याच्या गोपूज नाक्यापासून पश्चिमेस गोपूज खिंडीतून आहे.

पाण्याची सोय :

औंधच्या उत्तरेस व पूर्वेस डोंगर आहेत. पाण्याचे दोन मुख्य प्रवाह वायव्येकडून आग्नेयेस व उत्तरेकडून दक्षिणेस आहेत. हे दोन्ही प्रवाह एक होऊन जो मोठा प्रवाह झाला आहे तो नान्नी नदी म्हणून प्रसिध्द आहे. या प्रवाहाचें पाणी औंध येथे पिण्याचें कमीं उपयोगांत आणीत नाहींत. गांवच्या उत्तरेस १ मोठी विहीर आहे तिचें पाणी पॉवर पंपाने खजिन्यांत घेऊन तेथून नळाने गांवांत आणिलें आहे. हे नळ होण्यापुर्वींचे बरेच आडहि गावांत आहेत. गांवाला लागूनच २ बांधीव तळीं आहेत. त्यांचें पाणी पीत नाहीत, तथापि स्नानाची व पोहण्याची ती एक उत्तम सोय गांवस आहे. गांवची वस्ती उंचवट्यावर असून पावसाचें पाणी दोहो अंगच्या ओढ्यांतून वाहून जातें. पावसाळ्याच्या अखेरीस या ओढ्यांना धरणें धरून शेतांना पाटाचें पाणी काहीं महिने मिळण्याची सोय आहे. येथे तीन धर्मशाळा असून त्यांचा उपयोग प्रवासी लोकांना व फिरते धंदेवाले यांना चांगला होतो.

संस्था :

औंध येथे पोस्ट ऑफिस, तार ऑफिस, धर्मार्थ दवाखाना, श्रीयामाई श्रीनिवास हायस्कूल, मुलांची शाळा, मुलींची शाळा, उर्दू शाळा, त्रिंबककलाभुवन, औंध स्टेट मध्यवर्ती बँक लि, म्युनिसिपॅलिटी, ग्रामपंचायत, तालुखासभा, इत्यादी लोकोपयोगी संस्था आहेत.

बाजार :

औंध येथे दर मंगळवारी धान्याचा व शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो. सदर बाजारचे दिवशीं आसपासचे खेड्यांतून सर्व प्रकारची धान्यें, भाजीपाला, फळफळाव, लोणी वगैरे सर्व जिन्नस विक्रीकरितां येतात. दूरदूरचे व्यापारी कापड, मसाल्याचे जिन्नस घेऊन येतात. सदर दिवशीं जनावरांची खरेदी विक्रीही बर्याच प्रमाणावर होत असते.

यात्रा :

औंध येथे दरवर्षी एक पौष शु. १५ स व एक अनंत चतुर्दशीस अशा दोन यात्रा भरत असतात. पैकी पौषाची यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरत असते कारण यात्रेमध्ये बैल, गाई, म्हशी, घोडे वगैरे विक्रीकरितां दूरदूरचीं, नामांकित जनावरें येत असून त्यांची संख्या अजमासे १५ | १६ हजारांवर जाते. शिवाय कापडाचीं, स्टेशनरीचीं, भांड्याचीं, कांचेचीं, हलवायचीं वगैरे सर्व प्रकारच्या मालाचीं दुकानें येत असतात. सदर यात्रे मध्ये अजमासे ३ | ४ लाख रुपयांची घडामोड होते. पौर्णीमेच्या दिवशीं श्रीची दीपमाळ पाजळली जाऊन प्रतिपदेच्या दिवशीं श्रीची रथांतून मिरवणूक निघते. सदर यात्रेंतील नामांकित व अस्सल जातींच्या बैलांचें व गाईचें त्याचवेळीं प्रदर्शन भरून त्यांतील उत्तम जनावरांस श्रीमंत बाळासाहेब यांचे हस्ते बक्षीस दिलें जातें. त्याच प्रमाणें नामांकित पहिलवनांच्या कुस्त्या करविल्या जाऊन श्रीमंतांच्या हस्ते योग्य ती बक्षिसें दिलीं जातात.

उत्सव :

औंध गांवीं भाद्रपद शु || १४ स कै. राजर्षि श्रीनिवासराव महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त मोठा उत्सव होत असतो. सदर उत्सवाच्या ३ - ४ दिवसांच्या कार्यक्रमांत विद्वान लोकांची व्याख्यानें व प्रवचनें होत असून शु || १४ दिवशीं श्रीमंत महाराज हे आपल्या पितृचरणी नवीन एक कीर्तन सुमन अर्पण करीत असतात. व १५ मेस भंडारा व छबिना आणि प्रतिपदेस कुस्त्या वगैरे कार्यक्रम होत असतात. याचवेळीं औंध तालुक्यांतील सर्व विध्यार्थांचें हस्तकौशल्याचें प्रदर्शन भरत असतें.
फाल्गुन वा |. ३ स शिवजयंतीचा उत्सव करणेंत येत असतो. सदर दिवशीं सकाळीं श्रीछत्रपति शिवाजी महाराज यांच्या रौप्यमूर्तीची मिरवणूक निघते. मिरवणुकीस गांवांतील स्त्रीपुरुष व अधिकारीवर्ग हजर असतात. दुपारीं आमंत्रित पाहुण्यांचीं प्रवचनें होऊन सायंकाळीं श्रीमंत महाराज यांचें कीर्तन होत असतें. कीर्तनास अत्यंत गर्दी जमत असतें. शाळांतील विध्यार्थांचे खेळ व संवादहि शिमग्याचे सणानिमित्त पौर्णिमेपासून होत असतात.

कुंडल तालुका :

हें या तालुक्याचें मुख्य गांव असून याशिवाय या तालुक्यांत खालील गांवे आहेत.
१ कुंडल २ रामपूर ३ आळसंद ४ सोनकिरे ५ शिरगांव ६ बिचूद ७ गोंदी ८ दुशेरे ९ कोडोली १० कापील ११ मनू १२ पाडळी १३ घोणशी १४ सौदापूर १५ विरवडे
कुंडल गांवाखाली किर्लोस्करवाडी व विरवाडेखाली ओगलेवाडी अशा दोन वाड्या नवीन वसल्या आहेत.

गुणदाळ तालुका :

१ गुणदाळ २ बोळचिकलगी ३ नंध्याळ ४ केंगलगुत्ती ५ बोबलाद ६ शिरबूर ७ कानबूर ८ गलगले ९ जमगी १० होसूर ११ काळीवत १२ हंगरगी १३ कोट्याळ १४ धनर्गी १५ लोहगांव १६ टकळगी १७ हुबनुर. पैकी काळीवत हें गांव व्स्तीहीन बेचिराख आहे.

आटपाडी तालुका :

१ आटपाडी २ दिघंची ३ पेठ सुरापूर ४ लिंगिवरें ५ राजेवाडी ६ उंबरगांव ७ झरें ८ विभूतवाडी ९ निंबवडे १० पिंपरी बुद्रुक ११ घरनिकी १२ वलवन १३ चिंचाळें १४ घाणंद १५ कामथ १६ खरसुन्डी १७ नेलकरंजी १८ गोमेवाडी १९ हिवतड २० करगणी २१ शेटफळे २२ तडवळे २३ बनपुरी २४ माडगुळे २५ बोंबेवाडी २६ पिंपरी खुर्द. २७ कौटुळी २८ विठलापूर २९ शेरेवाडी ३० गळवेवाडी ३१ आवळाई ३२ पळसखेळ ३३ जांभुळणी हिं गांवें असून कांही गांवांखालीं वाड्या आहेत. पेठ सुरापूर हें कागदोपत्रीं स्वतंत्र गांव धरलें असलें तरी दिघंची गांवाचाच तो एक भाग आहे.
स्त्रोत : भवानराव गौरव ग्रंथ | भौगोलिक.....
औंधचे तळे
श्रीमूळपिठाचा डोंगर औंध
औंध स्टेट मध्यवर्ती बँक लि.
औंध सरकारी माळयांतील बंगला
श्रीमूळपिठाचा डोंगर औंध
औंध यमाई देवीचे मंदिर
औंध श्रीरामपंचवटी
औंध यमाई देवी मंदिराचा सभामंडप
औंध येथील सरकारी माळयांतील धरण
श्रीयामाई श्रीनिवास हायस्कूल
एडवर्ड VII हॉस्पिटल, औंध
औंध लायब्ररी
औंध विशाल बाग
कुंडल येथील इरण्णाचे डोंगरांतील ओहऱ्या.
श्री क्ल्लेश्र्वचे जुनें देऊळ, आटपाडी.

भौगोलिक निर्देशांक :

१७ ° ३३ '० "उत्तर, ७४ ° २०' ०" पूर्व

क्षेत्रफळ :

औंधचे क्षेत्रफळ २,२०८ हेक्टर ७५ आर इतके आहे.

प्राकृतिक रचना :

समुद्रसपाटीपासून २८०० फूट उंचीवर आहे.

हवामान :

हवा समशीतोष्ण आहे. दरसाल पावसाचें प्रमाण सरासरीने २५ ते ३५ इंच असतें.

जमीन :

जमीन बहुतेक माळरानाची असल्याने पुष्कळ पाण्यावाचून चांगली पिकत नाही.

नदीप्रणाली :

औंधच्या उत्तरेस व पूर्वेस डोंगर आहेत. पाण्याचे दोन मुख्य प्रवाह वायव्येकडून आग्नेयेस व उत्तरेकडून दक्षिणेस आहेत. हे दोन्ही प्रवाह एक होऊन जो मोठा प्रवाह झाला आहे तो नान्नी नदी म्हणून प्रसिध्द आहे.

वनक्षेत्र :

औंधच्या एकूण वनक्षेत्र सुमारे १२ हेक्टर २६ आर आहे. लागवडीकरिता एकूण जमीन १९३६ हेक्टर ८३ आर आहे. बिगरलागवडी खालील एकूण जमीन २०४ हेक्टर १० आर आहे. सार्वजनिक किंवा वापरासाठी नेमून दिलेली एकूण जमीन ६७ हेक्टर ८२ आर आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात क्षेत्रफळाच्या ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे आहे.

उर्जा साधने :

औंधच्या चारही दिश्यांना डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या स्थानांची उंची समुद्रसपाटी पासून ३,३०० फुट असल्याने पवन उर्जेचा मोठ्या प्रमाणावर स्त्रोत उपलब्द आहे. मागील ४ - ५ वर्षापासून वेगवेगळ्या कंपनीन मार्फत पवन चाक्क्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती चालू आहे.

दळणवळण :

औंध हें साताऱ्याचे आग्नेयेस सुमारें ४२.४ कि.मी. आहे. औंधास येण्याचा मुख्य मार्ग रहिमतपूर हे औंधला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन १९.५ कि. मी. वरती आहे. तसेच कराड रेल्वे स्टेशन ४०.४ कि. मी. व सातारा रेल्वे स्टेशन ४२.४ कि. मी. आहे. दुसरा मार्ग पुसेसावळी वडूज रस्त्याच्या गोपूज नाक्यापासून पश्चिमेस गोपूज खिंडीतून आहे.

प्रशासन :

औंध ग्रामपंचायत हि सन १९३९ साली स्थापन झालेली भारतातील पहिली ग्रामपंचायत आहे.
स्त्रोत : औंध गॅझेट | भौगोलिक.....
औंध येथील शेरीचे मारुती मंदिर
औंधचे माळरान
औंध येथील पवन चक्क्यां
भारतातील पहिली ग्रामपंचायत

ऐतिहासिक जनगणना :
इ.स.पूर्व ८०० ते ६०० काळातील ऋग्वेद या वैदिक ग्रंथात सर्वप्रथम जनगणनेचा उल्लेख आढळतो. त्यानंतर कौटिल्यीय अर्थशास्त्र (इ.स.पूर्व ३२१- २९६) या ग्रंथात कर आकारणीसाठी जनगणना करावी असे म्हटले आहे. अकबराच्या काळातील "ऐन-ए-अकबरी" या दस्त-ऐवजात जनगणना, आर्थिक व सामाजिक गणना याविषयी आकडेवारी आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळात औंध संस्थानात जनगणना केल्याची नोंद आहे. अशाप्रकारे जनगणनेस वैदिक काळापासूनचा इतिहास आहे.
औंध गांवची लोकसंख्या दोन्ही वाड्या धरून सुमारे ३,५०० आहे. यांत दोन अडीचशे मुसलमान असून बाकीचे हिंदू आहेत. भाषा मराठी आहे. लोक उत्सवप्रिय आहेत. श्रीमंत पंतसाहेब यांचेवर लोकांची फार भक्ती आहे. श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या काळात औंध संस्थांची लोकसंख्या तीन वेळा खानेसुमारी झाली त्या खानेसुमारी प्रमाणे लोकसंख्या खालीलप्रमाणें आहे -

 

सन

१९११

१९२१

१९३१

हिंदु

६५६२४

६१४८८

७२८२७

मुसलमान

३११५

२८१७

३४४२

इतर

२५६

२५५

२३८

एकूण

६८९९५

६४५६०

७६५०७

 

सन २००१ च्या जनगणने नुसार -

गांवची लोकसंख्या

५८३०

पुरूष

२९३०

स्त्रिया

२९००

एकूण

५८३०

स्त्रोत : भवानराव गौरव ग्रंथ आणि ग्रामपंचायत, औंध| भौगोलिक.....
औंधकर
औंधकर
औंधकर