इतिहास घडवला जात नाही तो घडत असतो
त्याची पाने पालटून जितकं माग जावं तितकाच तो नवा भासतो
मग तो पौराणिक आसो वा आधुनिक !
इतिहास हीच औंधची ओळख आहे
म्हणूनच आम्ही औंधचा इतिहास पुन्हा नव्याने प्रकाश झोतात आणत आहोत.....
इतिहास : औंध ... एक ऐतिहासिक आढावा !
पौराणिक कथा :
सृष्टीला नवनिर्मितीच वरदान लाभल आहे या वरदानाच्या आशिर्वादातून सौंदर्याचे दवबिंदू टपकत असतात जसं आपलं औंध.......
प्राचिन काळी औंध परिसरात मोरळातीर्थ अर्थात मोरळा म्हणून तीर्थ होते. मोरळातीर्थ हे पावन झालेले होते, नांदणीच्या पवित्र प्रवाहाने,गर्द झाडित पक्षांच्या किलबिलाटाने गुंजनाचे सुर छेडले जात होते तर धरणीवर प्रनिमात्रांनी सुखाचा संसार मांडला होता.त्यांना छोट्या छोट्या टेकड्यांचे कुंपन जे सुर्यकिरण सुद्धा पारखुन तिर्थात सोडे. असे हे ठिकाण ऋषी मुनींचे नंदनवन होते. भगवतीभक़्त, अम्ब, कृष्ण देवीध्यान करत होते.
या तिर्थावर एकदा एका असुराची वक्रदृष्टी पडली. आणि तो राक्षस सर्वाना त्रास देवू लागला.हा त्रास सोडवण्यासाठी सर्व भक़्तगणांनी देवीच्या आराधनेचा शुभारंभ केला. अदिशक़्तिने ही आराधना ऐकली व ती त्या असुराचा नाश करण्यास सज्ज झाली. घनघोर युद्धानंतर त्या असुराचा वध झाला. त्या असुरानेही देवीकडे करुणा भाकली व औंधासूर नावाच्या असुराच्या नावावरून 'औंध' हे नाव अजरामर झाले. औंध नावाबरोबर देवीचे वास्तव्य तेथे चिरकाल सुरु झाले. औंध एक पुण्यभूमी ठरली.
ऐतहासिक पाऊल खुणा :
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे संप्रतेचे मुख्य ठिकाण होय पूर्वी पंतप्रतिनिधी यांचे मुख्य ठिकाण कऱ्हाड येथे होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें हि तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. व उर्वरित दोन तळी अस्तित्वात आहेत.
इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता.
सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात.
१६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे.
इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला.
जंगलात जंगलाच्या राजा बरोबर गुण्या गोविंदाने राहणाऱ्या औंधकरांमध्ये सुद्धा राजेशाहीची बिजांकुरे रोवालीगेली.
छोटे मोटे राजे सिंहासनावर स्थानपन्न झाले आणि एक नवी परंपरा अस्तित्वात आली.
काही राजांनी तर आपली कारकीर्द सुवर्ण हस्ताक्षरात लिहिली.
औंध ... राजघराण्यांचा एक आलेख !
पंतप्रतिनिधी घराण्याचा इतिहास :
१६६६ मध्ये स्थापन झालेले १३०० कि.मी. जागेवर वसलेले औंध हे महाराष्ट्रातील महत्वपूर्ण संस्थान आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे संप्रतेचे मुख्य ठिकाण होय पूर्वी पंतप्रतिनिधी यांचे मुख्य ठिकाण कऱ्हाड येथे होते. कऱ्हाड इंग्रज सरकारात दुंलामुळे इ.स. १८५४ ते गेल्यानंतर श्रीमंत पंतप्रतिनिधींची गादी औंध येथे आली. अठराव्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रात पुन्हा मराठाशाही स्थापन झाली त्यावेळी प्रतिनिधी घराण्याचे, मूळपुरुष परशुराम त्र्यंबक यांना प्रतिनिधी पदवी पुन्हा मिळाल्यापासून (इ.स. १७०१) औंध तालुक्यावर पंतप्रतिनिधींचा अंमल झाला. तो इ.स. १८०६ साली पेशव्यांची जप्ती होई पर्यंत होता. पुढें १८११ साली जप्ती खुली झाल्यावर पुन्हां प्रतिनिधींचा अंमल बसला तो सारखा चालू आहे.
किन्हई : श्रीमंत पंतप्रतिनिधी हे किन्हई येथील कुलकर्णी आहेत. प्रतिनिधी घराण्याचे मूळ संस्थापक परशुराम पंत व त्यांचे वडील त्र्यंबकपंत यांचे आधी दोन तीन पिढ्या किन्हईचा उल्लेख सापडतो.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात कऱ्हाड व मसूर या घराण्याबरोबर हेंही गाव शहाजी महाराज भोसले यांच्या जहागिरीत जाऊन नंतर मराठी राज्याची स्थापना झाल्यावर ते मराठी राज्यात अंतर्भूत झाले. १८ व्या शतकाच्या प्रारंभी पर्शुरण त्र्यंबक हे प्रतिनिधी पदाचे अधिकारी झाल्यावर त्यास इ.स. १७१३ त हा गाव इनाम मिळाला. तो इ.स. १८०६ पर्यंत प्रतिनिधींच्या ताब्यात होता. पुढे पेशवे सरकार कडून हा गाव जप्त करण्यात आला. नंतर इ.स. १८६६ त इंग्रजसरकारकडे हा गाव असता वावतीअमलाबद्दल पुणे खजिन्यातून जे रुपये ४००० दरवर्षी प्रतिनिधीस रोख मिळत त्याबद्दल पुन्हा प्रतिनिधींकडे देण्यात आला.
औंध संस्थान कालीन राज्यांचा तपशील पुढील प्रमाणे :
औंध संस्थानाची स्थापना |
||||
१६९० / १६९९ |
||||
राजा पंतप्रतिनिधी (किताब) |
||||
पासून |
पर्यंत |
नाव |
जन्म |
मृत्यू |
इ.स. १६९७ |
मे २७, इ.स. १८१८ |
परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी |
इ.स. १६६० |
इ.स. १७१८ |
इ.स. १७१८ |
नोव्हेंबर २५, इ.स. १७४६ |
श्रीनिवासराव परशुराम "श्रीपतराव" पंतप्रतिनिधी |
- |
इ.स. १७४६ |
इ.स. १७४६ |
इ.स. १७५४ |
जगजीवनराव परशुराम पंतप्रतिनिधी |
- |
- |
इ.स. १७५४ |
एप्रिल ५, इ.स. १७७६ |
श्रीनिवासराव गंगाधर पंतप्रतिनिधी |
- |
इ.स. १७७६ |
इ.स. १७७६ |
ऑगस्ट ३०, इ.स. १७७७ |
भवानराव पंतप्रतिनिधी |
- |
इ.स. १७७७ |
ऑगस्ट ३०, इ.स. १७७७ |
जून ११, इ.स. १८४८ |
परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी |
इ.स. १७७७ |
इ.स. १८४८ |
जून ११, इ.स. १८४८ |
इ.स. १९०१ |
श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी अण्णासाहेब |
नोव्हेंबर २७, इ.स. १८३३ |
इ.स. १९०१ |
इ.स. १९०१ |
इ.स. १९०५ |
परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी "दादासाहेब" |
फेब्रुवारी १७, इ.स. १८५८ |
इ.स. १९०५ |
नोव्हेंबर ३, इ.स. १९०५ |
नोव्हेंबर ४, इ.स. १९०९ |
गोपाळकृष्णराव परशुराम पंतप्रतिनिधी नानासाहेब |
- |
- |
नोव्हेंबर ४, इ.स. १९०९ |
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ |
भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी बाळासाहेब |
ऑक्टोबर २४, इ.स. १८६८ |
एप्रिल १३, इ.स. १९५१ |
पंतप्रधान |
||||
इ.स. १९४४ |
इ.स. १९४८ |
परशुराम राव पंत |
सप्टेंबर ११, इ.स. १९१२ |
ऑक्टोबर ५, इ.स. १९९२ |
पंत प्रतिनिधी :
पंत प्रतिनिधी हे पद राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत निर्मीले गेले. छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली जिंजीला असताना प्रल्हाद निरोजी ह्यांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमले. हेच पहिले प्रतिनिधी. त्यांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर १६९४ साली तिमाजी रघुनाथ हणमंते ह्यांची ह्या पदी नेमणूक झाली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१ साली राणी ताराबाईंनी परशुरामपंत त्रिंबक ह्यांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर पंताच्या पुढच्या वंशावळीस पंतप्रतिनिधी असे संबोधले जाऊ लागले.
०१.) परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी :
परशुराम त्रिंबक किन्हईकर (इ.स. १६६० - इ.स. १७१८) हे छत्रपतींचे पंतप्रतिनीधी आणि नंतरच्या औंध संस्थानाचे संस्थापक होते.
कारकीर्द :
परशुरामपंत वयाच्या १४ व्या वर्षी रामचंद्रपंत अमात्यांच्या कार्यालयात विशाळगडास रुजू झाले. दप्तरीच्या आणि लष्करच्या कारभारात चोख असणाऱ्या पंतांची प्रगती झपाट्याने झाली आणि अल्पावधीतच त्यांची अमात्यांचे सहाय्यक म्हणून नेमणूक झाली.
छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला होता. अशा काळात औरंजजेबाच्या ताब्यातला पन्हाळगड पंतांनी १६९२ साली मोठ्या हिकमतीने परत जिंकून घेतला. यानंतर अमात्यांच्या मोलाच्या मार्गदर्शानाखाली पंतांनी मिरजेपासून प्रचितगडापर्यंतचा मुलूख पादाक्रांत केला. त्याबरोबरच भूदरगड आणि चंदनगडासारखे किल्लेदेखील पुन्हा स्वराज्यात आणले.
पुढे औरंगजेबाने १६९९च्या शेवटास सातारच्या किल्ल्याला वेढा घातला असता पुढचे ५ महिने पंतानी ह्या किल्यावरच्या मराठ्यांना रसद पुरवली आणि किल्ला झुंजवण्यास मोलाची मदत केली. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने - राणी ताराबाईंनी - मुघलांविरुद्धचा लढा सुरु ठेवला तेव्हा पंतांचा त्यांना मोठाच आधार होता. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना सुभालष्कर, समशेर जंग असे किताब बहाल करण्यात आले.
सातारच्या किल्ल्याप्रमाणेच १७०२ साली पंतांनी विशाळगडदेखील तब्बल ५ महिने झुंजवला पण सरतेशेवटी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. पण ताबा पुढच्या ५ वर्षातच म्हणजे १७०७ साली मुघलांशी निकराची झुंज देऊन परत काबीज केला. त्याचबरोबर सातारा, वसंतगड, पन्हाळगड हे किल्ले परत स्वराज्यात आणले.
१८ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात परशुरामपंत सातारच्या शाहू महाराजांच्या सेवी रुजू झाले. तिथपासून कराड आणि आजूबाजूचा मुलुख हा पंतप्रतिनिधींच्याच ताब्यात होता आणि त्यांचा कारभार कराडच्या भुईकोटातून चाले.
परशुरामपंत हे जसे राजकारण कुशल, मुत्सद्दी, शूर, होते तसे ते कीर्तनकार व उत्तम कवी होते. यांच्या कविता प्रसिध्द आहेत. १८१८ साली परशुरामपंतांचे निधन झाले.
०२.) श्रीनिवासराव परशुराम उर्फ श्रीपतराव :
इ.स. १७१८ ते नोव्हेंबर २५, इ.स. १७४६ राजपद सभाळले. कृष्णराव खटावकरांचे बंड मोडते समयी श्रीनिवासराव परशुरामरावांनी दाखवलेले शौर्य पाहून शाहू महाराजांची त्यांच्यावर मर्जी बसली होती. म्हणूनच त्यांनी माधवराव त्र्यंबक यांना श्रीनिवास दत्तक नेमले असताना सुध्दा श्रीनिवास यांना परशुरामाचे चिरंजीव मानून प्रतिनिधी पदाची वस्त्रे दिली. श्रीनिवास यांना सोन्याच्या काठीचे भानदार, सोन्याचे दांडीची चावरी, सोन्याचे तोडे व सोन्याचे मोर्चेले वापरण्याचा मान मिळाला होता.
श्रीनिवासराव परशुराम उर्फ श्रीपतराव यांचा मृतू इ.स. १७४६ ला झाला.
०३.) परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी उर्फ थोटेपंत :
परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी (जन्म १७७७ - मृत्यू १८४८) हे औंध संस्थानाचे राजे.
परशुरामराव श्रीनिवास यांना " अवलिया थोटेपंत " म्हणून सुध्दा ओळखले जाते.
दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सरदार बापू गोखले ह्यांच्याशी मसुरेजवळ लढाई झाली त्यात त्यांना आपला हात गमवावा लागला. म्हणून त्यांना लोक थोटेपंत ह्या नावाने देखील ओळखत असत. पुढे त्यांचे पुण्याला वास्तव्य असताना दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे हे त्यांच्या मागावर होते आणि त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे पंतांना पुण्यातून पंत प्रतिनिधींची तत्कालिन राजधानी असलेल्या कराडला पळ काढावा लागला.
कर्मधर्मसंयोग असा की खुद्द दुसरा बाजीराव ईंग्रजांपासून पळून जात असताना १८१८ साली कराड मुक्कामी होता.
त्यांना वाच्यासिद्धी होती तसेच ते कुणी अवतारी पुरुष असावेत असे त्यांच्या सानिध्यातील लोकांचे म्हणणे होते. स्वत:चे त्यांना अपत्य झाले नव्हते, त्यांनी दत्तकविधान केले होते. परशुरामपंत हे वैशाक शु. ८ शके १७७० ता. १० माहे मे सन १८४८ इ. रोजी सातारा मुक्कामी मृत्यू पावले. परशुरामपंतांचे वृंदावन संगममाहुलीस आहे.
०४.) श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी :
श्रीनिवासराव परशुराम पंतप्रतिनिधी तथा अण्णासाहेब हे औंध संस्थानाचे राज्यकर्ते होते. परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधींचे ते दत्तक पुत्र होते. ११ जून १८४८ पासून राज्याचा कारभार पाहू लागले. यांच्या कारकिर्दीत हायस्कूलची निर्मिती झाली व मंदिरांचे जर्णोध्दार झाले. श्रीनिवासराव यांचे सध्दर्माचरण, इंद्रियनिग्रह आणि निस्पृहता या गुणांमुळे लोक त्यांना राजश्री म्हणू लागले. ता. २६-०९-१९०१ साली कैलासवासी झाले.
श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी :
भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (ऑक्टोबर २४, १८६८ - एप्रिल १३, १९५१) हे महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे नोव्हेंबर ४, १९०९ - ऑगस्ट १५, १९४७ या काळादरम्यान राजे होते.
भवानराव चित्रकलेचे आश्रयदाते व स्वतः चांगले चित्रकार होते.
'अर्थमूलौ धर्मकामौ' हें बाळासाहेबांचे सूत्र होते. धर्म आणि काम हे अर्थावर अवलंबून असते. म्हणूनच आपल्या प्रजेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे बाळासाहेबांचे विशेष लक्ष होते. सूतसारापद्धति हि शेतकऱ्यांसाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सहाय्य होणारी होती. न्याय व्यवस्थेमध्ये सल्लागार पंचाची जोड हि फक्त औंध संस्थानातच होती.
राज्यकारभारविषयक प्रगति आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याविषयींचे प्रयत्न ह्यांच्याबरोबर ललित कलांचा झालेला परिपोष म्हणजेच औंध संस्थान.
बाळासाहेब हे पहिल्या पंक्तीचे कीर्तनकार होते. त्यांच्या अंगी विविध कला अधिष्ठित झाल्या होत्या - नावाजलेले चित्रकार, शिल्पकलेचे ज्ञानहि संपादन केले होते, नाटकाची हौस होती, फोटोग्राफी उत्तम होती, कीर्तनाकरितां काव्यरचना, अश्या अनेक कला चे अधिष्ठान म्हणजे बाळासाहेब अश्या राजामुळे औंध संस्थान कला-मंदिर बनले होते.
* बाळासाहेबांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !
परिचय :
औंधचे पहिले पंतप्रधान श्रीमंत परशुरामराव भगवानराव उर्फ अप्पासाहेब पंडित पंतप्रतिनिधी बुधवार दि. ११ सप्टेंबर. १९१२ जन्म.
सोमवार दि. ०५ अक्टोबर १९९२ रोजी मृत्यू.
कार्यक्षेत्र :
१६४४ - १९४८ औंधचे पहिले पंतप्रधान, बी. ए. (ऑनर्स.), एम. ए. (ऑक्सफोर्ड युनिवरसिटी), बॅरीस्टर-एट-लॉ, लिंकन'स इन्न; भारताचे परराष्ट्रातील राजदूत.
पुरस्कार :
पद्मश्री पुरस्कार विजेते
औंधशी ऋणानुबंध :
इ.स. १९४४ ते इ.स. १९४८ या कालावधीत आप्पासाहेब हे औंधचे पहिले लोकनियुक्त पंतप्रधान होते.
१९३२ : ९ जानेवारी औंध राजधानी इंडियन ग्लायडिंग अॅसोसिएशनचें केंद्र करण्याचा प्रयत्न.
१९ एप्रिल रोजी कराची ते औंध विमानाने प्रवास केला (निम्याहून अधिक प्रवास स्वत: पायलटचे काम केले)
दक्षिणेंतील पहिले वैमानिक राजपुत्र श्रीमंत अप्पासाहेब यांचा गौरव. १९३७-१९४७ बाळासाहेब, मोरीस फ्रीडमन आणि महात्मा गांधी यांच्या साह्याने औंध एक्प्रीमेंट ( लोकशाही ) औंध संस्थानात राबिवली.
१९३९ मध्ये स्वत: आप्पासाहेब इतराबरोबर औंधची बाजार पेठ व गणेश खिंडीतील रस्ता बनवण्याचे काम केले.
१९४८ पं. जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे परराष्ट्रातील राजदूत म्हणून ब्रिटीश इस्ट आफ्रिका येथे नेमणूक केली,
१९५१ - १९६१ पॉलीटिकल ऑफिसर म्हणून सिक्कीम, भूटान आणि तिबेट येथे महत्वपूर्ण कामगिरी.
१९६९ - ७२ मध्ये इंडोनिशिया, लंडन, इटली येथे भारतीय राजदूत म्हणून काम केले.
अप्पासाहेबांनी इंग्रजी मध्ये काही पुस्तके लिहिली ती खालील प्रमाणे -
An Unusual Raja - Mahatma Gandhi and the Aundh Experimen, Hyderabad: Sangam Books, 1989.
Surya Namaskar, an ancient Indian exercise, Bombay, Orient Longmans, 1970.
A Moment in Time, Bombay: Orient Longman, 1974.
Mandala: An Awakening, Bombay: Orient Longman, 1976.
Survival of the Individual, London: Sangam Books, 1983.
Undiplomatic Incidents;. Bombay, Orient Longman Limited, 1987
An Extended Family of Fellow Pilgrims,. Bombay, Sangam Books, 1990
निर्मात्यांचे वैयक्तिक मत :
आज २१ व्या शतकात लोकशाही राष्ट्रे अनेक आहेत. लोकशाहीवादीचे शिद्धांत मांडणारेही अनेक आहेत. आदर्श लोकशाही कशी असावी यावर संशोधनही चालू आहे. पण लोकशाहीच्या महारथापुढे एक प्रत्यक्षात लोकशाहीच आदर्श रोपटं वाढण्याआधीच कुस्करल गेलं, हे जीवनातील भीषण वास्तव्य आहे. (१८६८) १९०९ ते १९४७ (१९५१) म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत औंध राज्यात लोकशाहीचे खालील प्रयोग यशस्वी झाले -
१.) औंध स्नाथानात पहिली कमर्शियल बँक जून १८४८ मध्ये सुरु झाली. तिचे नावं औंध संस्थान मध्यवर्ती बँक ली. असे होते.
२.) शेतसारामोजण्याची 'महालवारी पद्धत' सर्व प्रथम औंधमधेच सुरु झाली.
३.) संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे होते.
४.) औंध संस्थानात सूर्यनमस्कार सक्तीचे होते. मुलींनी नमस्कार घालावेत, स्त्रियांचे आरोग्यही उत्तम असावे, त्यांना बाळंतपाणात सर्व सोई-सुविधा मिळाव्यात यावर महाराजांचा कटाक्ष असे.
५.) महाराज स्वत: औंधमध्ये अचानक फेरी टाकत व स्वच्छ असणाऱ्या घराला प्रमाणपत्र देत.
६.) औंधमध्ये भूमिंतर्गत सांडपाणी निचरा होवून जाण्याची सोय होती. त्यामुळे रोगराई पसरत नसे.
७.) औंध कलेचे माहेरघर होते. जेथे चित्रकार, गायक, शिल्पकार अश्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव होता. तसेच भारतीय संस्कृती, अजिंठा वेरूळ शिवाय विदेशी चित्रसंग्रह असे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रे असणारा भारतातला एकमेव चित्रसंग्रह येथे आहे.
८.) औंध संस्थान हे हिंदुस्थानातील ग्लायडींगची जन्मभूमी आहे साल - १९३२.
९.) औंधच्या राज्याच्या कुंचल्यातून चीत्ररामायण रेखाटले गेलेच आहे. त्याचबरोबर 'संपूर्ण महाभारत' जगासमोर आणण्यासाठी महाराजांनी भगीरथ प्रयत्न केले होते.
१०.) किर्लोस्कर, ओगले या सारख्या कारखान्यांची निर्मिती औंधमुलेच बनली होती.
११.) मुक्तकाराग्रह संकल्पना औंधनेच जन्माला घातली.
१२.) भारतातील पहिली ग्रामपंचायत १९३९ साली औंधमध्ये स्थापन झाली, तो लोकशाहीचा प्रयोग म्हणून प्रसिध्द आहे. त्यामुळेच पं. नेहरूंनि औंधला भेट दिली होती.
१३.) दृष्टी सुधारण्यासाठी महाराजांनी 'नेत्रबलसंवर्धन' या पुस्तकातून डोळ्याच्या व्यायामाचे २७ प्रकार मांडले आहेत.
१४.) औंधच्या राज्यांना शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता अपेक्षित नव्हती तर शिक्षण म्हणजे व्यवसाईक ज्ञान अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी त्र्यंबक कला भावनाची निर्मिती केली होती.
वरील १ ते १४ वैशिष्ठ्ये लक्षात घेतली तर औंधच्या राज्यात रामराज्य होते. हे रामराज्य बाळासाहेबांनी भारत सरकार मध्ये सर्व संस्थानिकांप्रमाणे विलीन केले. औंध एक राज्यापासून एक सामान्य खेडे बनले. 'राजा' हा किताब गेला, राज्य गेले आणि जनता पोरकी झाली भारत सरकार मायबाप झाले पण भारतातील असंख्य खेडी, विभागली गेलेली राज्य यांच्या गर्दीत औंधची कुचंबनाच होत गेली.
कलाकरांच्या अंगात, हातात कला वसली होती पण तिला जाणणारा, वाढवणारा वाली राहिला नाही, आर्थिक वंचना संपून कला जतन करणे कलाकाराला जमले नाही. आर्थिक गोष्टी मिळवू पर्यंत कला वाढली नाही थोडक्यात त्यांना कलेचे आधुनिक भारतात 'मार्केटिंग' जमले नाही. ते स्वत:च्या काळे सहित नामशेस झाले. त्यातील काही हाताच्या बोटावर मोजनाऱ्यांनी कला जिवंत ठेवली आहे पण औंधशी प्रत्यक्ष नाते तुटले आहे.
कारखानदार पंख फुटलेल्या पाखरांप्रमाणे झरकन शहरात उधून गेले तेथेच मोठे झाले. भयाण भकास राहिले ते मात्र औंधमध्ये सुरुवात केलेले कारखाने, मुद्रणालये, बँका ......
सगळा हा काळाचा महिमा असलातरी दु:ख अनावर होते जेव्हा एकदा औंधकर दारू पिऊन औंधच्या राजवाड्या समोर पडतो, एकाद्या विद्यार्थाला सरपंचांची सही घ्यायला दारूच्या दुकानात जावे लागते....,
जेथे संस्कारांची गंगा वाहिली, सूर्यनमस्कार, नेत्रव्यायाम, चित्रकला, शिल्पकला, अश्या विविध कलानी आपली सोनेरी पावले टाकली तेथे आज काय चालते ?
असो औंधमध्ये सर्वच काही वाईट नाही. त्यातूनही याच राजघराण्याच्या स्नुषा त्यांच्या पूर्वजांच्या वारसा पुन्हा उभारू पाहत आहेत, पुन्हा औंधविकास करायच्या कल्पना मांडत आहेत आणि त्या यशस्वी करीत आहेत. परमेश्वर त्यांना चांगल्या कामांत यश देवो ! औंधचे गतवैभव पुन: प्राप्त होवो हीच यमाई चरणी प्रार्थना !