जीथं मानवाचं कर्तुत्व थिट पडत. बुद्धीच्या तल्लखतेला मर्यादा पडतात.
तिथच एक अनामिक आदिशक्तीच अस्तित्व सुरु होत.
आदिशक्ती आणि मानवी प्रगती यांच्यामध्ये श्रद्धेचा दुवा ज्यांच्या हाताला लागतो,
तो जीव एका अनामिक ओढीनेच...
औंधच्या श्री यमाई देवीच्या चरणी माथा आदर्शाने झुकवण्यासाठी येतो.
श्री यमाई देवी महात्म्य : औंध... एक तिर्थक्षेत्र !

श्री यमाई देवीची आरती

 

आरती आदिशक्तीची

जयदेवी आदिशक्ती | सुंदर सगुण मूर्ति | आरती ओंवाळीतो मनि उत्साह प्राप्ती || धृ ||
सगुण तूंचि ब्रह्म | सदा आनंद पूर्ण, विश्वचि व्यापियेलें | मायारूप धरियेलें || जय ० || १ ||
देव हे सकळ ध्याती तुझे पाय वंदिती | अभयासी पूर्ण देशी, वेद सतुतिही करती || २ ||
कीर्तीचे घोष गातां, सद्य होई तूं आतां | मागणें हेंचि आहे, परशुरामासी पाहे || जय ० || ३ ||

 

अंबेची आरती

निर्गुण जें होतें सगुणत्वा आलें, चराचर सकळीक तुज पासोनि झालें,
माया वेष्टित जग हें सगुण त्वां केलें, त्रैलोक्य सत्य ऐसें आपुलेंनि झालें,
जय देवी जय देवि जय आदि शक्ती, आरती ओंवाळूं एकाग्र भक्तिं ॥ १ ||
एसें सगुण तुजला लेणें जडिताचें, अनेक वस्त्रें शोभति कांचनभरिताचीं,
बैसुनि सिंहासनीं नृत्यें गणिकांची, पाहसी तूं जननी त्रैलोक्यीं साचीं || २ ||
हरिहर ब्रह्मादिक येती नमनासी, जे जे वर मागती ते ते त्यां देशी,
कृपाळु अंबे माते पालन भक्तासी, परशुरामा दीना करुणा कर होशी || ३ ||

 

स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
आरती
इ. स. १७४४ सालची घंटा
यमाई देवीच्या अस्तित्वाची कथा सांगितली जाते. तो काळ म्हणजे दंडकारण्याचा. जेव्हा येथे मनुष्य वस्ती फारच विरळ. वृक्षवल्लींची दाट वस्ती. त्यातूनही ऋषी मुनी, देव देवता यांची या शांत परिसरात विश्रांतीसाठी पसंती होती. मनुष्याचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेत. विविध लीलया करून दाखवत.
असच एकदा घनदाट अरण्यात शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते. तेव्हा पर्वतीमातेचे एका मानवी आवाजाने लक्ष वेधून घेतले. त्यांनी शंकर भग्वानांना विनंती केली. 'कुणी मनुष्यास आपली मदत हवी आहे तरी तुम्ही तातडीने मदत करा '.शंकरांनी पार्वती मातेची समजूत काढली व स्पष्टीकरण दिले. पार्वती तू ज्यांची काळजी करतेस तो सामान्य माणूस नसून या विश्वाची काळजी करणारा विष्णूचा अवतार रघुवंश राजकुमार श्री राम आहे. त्यांची पत्नी सीता हिच्या शोधात. श्री राम बाहेर पडले आहेत याचा अर्थ रावणात अंतकाळ जवळ आला आहे. ही त्या भगवंताची लीला आहे आणखी काही नाही.
पार्वती मातेला या विधानांवरती विश्वास बसेना. तेव्हा हे दैवी पुरुष मग सीतेसाठी शोक का? सीतेसाठी हा शोध का? श्री रामांची परीक्षा घेण्याचे पार्वती मातेने योजले. शंकराची अनुमती घेतली व सीतेचे रूप धारण केले.व राम लक्ष्मण यांचा राज्यात पार्वती माता सीतेच्या रूपात शोक करत बसली.श्रीरामांनी मात्र अर्त:नयनांनी माता पार्वतीला ओळखले व 'ये माई तू शोक का करते?'असे विचारले व पार्वती मातेला 'यमाई' म्हणून वंदन केले. श्रीरामांना दर्शन देऊन यमाई तेथे अंर्तध्यान पावली. पुढे हीच यमाई भक्तांची यमाई माता व ग्रामदैवत बनली. म्हणून पार्वती मातेची तेथेही स्थापना झाली. तरीही पार्वतीमाता श्रीरामांना फसवण्यासाठी पुन्हा सीतेचे सोज्वळ रूप धारण करते. रस्त्यातील लक्ष्मणाला सीतेच्या प्रेमळ आवाजात 'सोबत नेवून हा वनवास संपवायची विनंती केली' तेव्हा लक्ष्मणलाही हीच आपली सीतामाता हा संपूर्ण विश्वास होता. पर्वतीमातेला सीता मानून लक्ष्मण सीता वाहिनीच्या चरणी माथा टेकवतात.
'यमाई' नावाने ह्यापण पावल्यानंतरही पार्वती मातेने हार मानली नाही. पुन्हा तिने सीतेचे रूप धारण केले.श्रीरामांचे नाव घेत आकांत सुरु केला केस भार संपूर्णपणे मोकळा केलेला डोळ्यात पाणी दाटलेले तसेच अर्त करुनिया आवाज पाहून श्रीराम थक्क झाले व म्हणाले 'ये मोकळ्या माई' असे म्हणून पुन्हा शरीरान व लक्ष्मण यांनी पार्वती मातेला वंदन केले. 'मोकळाई माई' पण श्रीरामांची नजर जेव्हा जेव्हा सितारूपी पार्वती मातेवर पडते तेव्हा त्यांना सत्य उमगते व ते पार्वतीमातेला ओळखतात व म्हणतात "हे माते तू वारंवार रूप बदलून समोर येतेस?" श्रीरामांच्या ह्या प्रश्नांवरून श्रीराम हे मनुष्य नसून दैवीअवतार असल्याचा पार्वती मातेच्या लक्षात आले. पार्वती माता पु पार्वती माता जेव्हा पुन्हा शंकरांना हा वृत्तांत सांगते तेव्हा शंकर पुन्हा पार्वती मातेला कथन करतात-श्रीराम ज्या ज्या वृक्ष वल्लींना सीता मातेचा शोध विचारून आलिंगन देत आहेत, ते वृक्ष बनून वर्षानुवर्ष भागवतांची वाट पाहत तपश्चर्या करत बसलेले ऋषीमुनी आहेत आणि शरीरान तेही त्यांना बरोबर त्यांना मुक्ती मिळत आहेन्हा श्रीरामांना दर्शन देते तेव्हा ती तेथे 'तुकाई' नावाने स्थापित व श्रीरामांवर प्रसन्न होवून त्यांना विजयीभव हा आशीर्वाद देतो. तसेच त्यांना पार्वतीमातेचे श्रीरामांची परीक्षा घेणे हे देखील विधिलिखित होते. 'यमाई' 'तुकाई' 'मोकळाई' यांनी पुढे जाऊन भक्तांचा उद्धार करण्याची मोय्ही जबाबदारी उचलायची आहे हे दंडकारण्यातील या पवित्र भूमीवरील धर्मस्थापना निश्चित आहे. ऐकून पार्वती मातेने शंकरांना भक्तिभावाने वंदन केले.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
श्रीमूळपीठदेवी, तांदळ्यासह
गावातील यमाईदेवी
वैकुंठ, स्वर्ग, कैलास, विष्णू निवास अशी विविध देव - देवांची निवासस्थाने असली तरी पृथ्वीतलावर निसर्गाच्या सानिध्यात राहणे परमेश्वर पसंत करतो. जेथे निसर्गमुक्त हलावे आपली कला - कौशल्य उधळतो ....
शांती, गारवा असतो अशा ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असते. असंच एक ठिकाण - दंडकारण्य म्हणून ओळखले गेलेल्या अरण्याचा कुकुंम तिलक म्हणजे सध्याचा औंधमधील डोंगरपरिसर मूळपीठ.
सूर्यकिरणांमध्ये जमिनीवर उतरण्यासाठी स्पर्धा लागावी अशी दाट झाडी ....त्यात पडणारे कवडेस्वरूपी सूर्यकिरण .... झाडांच्या गर्दीत उताराच्या दिशेने पळणारे मधुरपाणी .... दाट जंगलात ती शांतता भांगावणारे पशु-पक्षी प्राणी .....येथे परमेश्वर वास करत असे देवी यमाईचे हे निवासस्थान म्हणजे जणू तिचे माहेर घरचं मूळपीठ.या निवासस्थानी तिच्या अस्तित्वाच्या खुणा आजही श्रद्धास्थाने बनून आहेत. अगदी अनादी काळापासून ते आजच्या कालयुगाच्या मानव वस्तीत सुद्धा तिचे विविध दाखले आहेत.
पुरातन ( देविदेवतांचा काळ ) काळात येथे देवीचे वास्तव्य आणि अमाप सृष्टीसौंदर्य यामूळ हृषी- मुनींचे तपाचे हे ठिकाण होते. हृषीमुनींचे तप येथेच फळाला जाई. येथील तपसाधनेच्या पुण्याईवर मुलामुलींना इच्छित वरप्राप्ति, मोक्ष प्राप्ती होई. या हृषीमुनींच्या मांदीआळीत एक महत्त्वाचे रत्न म्हणजे अंबहृषी त्यांनी मोरणतीर्थ येथे ध्यानसाधना आरंभली होती. तपाचे तेज चारी दिशांना पसरत होते पुण्याईचा दरवळणारा सुगंध काही दृष्ट राक्षसांना रुचला नाही ......त्यातील एक होते औंधासूर ....कोणी होम हवन करून पुण्या प्राप्त कराव हे त्याला न पटनार कारण तो स्वतः सर्व युद्धकौशल्यात निपुण होता, सर्व शस्त्रात पारंगत होता, मायावी विद्या जाणकार होता, हे सर्व त्याला परमेश्वर कृपेने प्राप्त झाले होते. पण एक असुर असल्याने त्याला सर्व विध्यांचे स्वामित्व येताच स्वतः परमेश्वर झाल्याचा भ्रम झाला होता. ऋषिंनी आता यज्ञ त्याग करून फळ प्राप्ती न करता त्याची उपासना भागावी हेच त्याने मांडले होते. अशा वेळी तो अंब ऋषींचा यज्ञ कसा बरं होऊ देईल?
अंब ऋषिंनी इतर ऋषींना पाचारण करून यज्ञाची तयारी सुरु केली होती. यज्ञासाठी लागणारी समिधा - चंदन, धूप, फुले, पाने इ. प्राप्त झाल्यावर यज्ञ सुरु झाला .... मंत्र उच्चारांनी आसमंत तृप्त झाला तर वातावरणात तेज पसरते. या तेजाने भयभीत राक्षसगण औंधासुराला याची कल्पना द्यायला गेले. गर्वाने आंधळ्या झालेल्या औंधासुराने तो यज्ञ भ्रष्ट करण्यास सांगितले.
राक्षस लोक यज्ञ भ्रष्ट करण्यासाठी मृत पशु घेऊन आले, यज्ञाच्या त्या पवित्र अग्नीत मृत पशूंना फेकण्यात आले. त्यामुळे यज्ञाचे पावित्र्य नष्ट झाले.पवित्र मंत्रोच्चार थांबले यज्ञ भंग झाल्याने हृशिगन दुखी कष्टी झाले. त्यांनी परत यज्ञ मोठ्या कष्टाने सुरु केला पण औंधासुरापुढे तो काही पूर्णत्वास जाईना तेव्हा मात्र यावर उपाय काय करावा हे ऋषींना सुचेना. शेवटी आपली रक्षनकर्ता यमाई देवीची करुणा भाकण्याचा विचार सर्वांनी पक्का केला व सर्वजण मूळपिठावरती आले. तेथे देवाची आराधना सुरु झाली. देवी अंतज्ञानी होती. तिने औंधासुराचा अंत जाणला होता. आता फक्त त्या अंताला कारणमात्र युद्ध होणार होते. आणि पुन्हा एकदा असुरांच्या अन्यायाचा नाश होऊन, प्रेम भक्ती, यांचे प्रभुत्व सिद्ध होणार होते.
युद्धाचा सारीपाठ मांडला गेला यमाईने युद्ध सहकार्याला पराक्रम श्रेष्ट ज्योतीबा, कालभैरवी, कालका, महालक्ष्मी असे विविध देवतांना बरोबर घेतले आणि यज्ञाचे संगरक्षण सुरु झाले.
औंधासूर आपल्या राक्षसगनासह युद्ध मैदानावर उतरला होता. तुंबळ युद्ध सुरु झाले. मायावी राक्षस आणि देव-देवता यांच्यात अस्त्र - शास्त्र निनादू लागली. राक्षसांच्या सांडनारया रक्ताच्या साठ्याने पृथ्वी शांत होत होती.
युद्धवर्णन :
आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भावानिमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड:ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण रक्ताच्या तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. यज्ञ सुरु झाल्याची बातमी राक्षसांना लागताच राक्षस कल्लोळ माजवत धावले मृत जनावरे हातात होतीच पण मृत जनावरे यज्ञापर्यंत पोहोचण्या आधीच सरसर करत एका बाणाने लाक्षवेधात एक असुर जमिनीवर पडला त्यापाठोपाठ बाणाच्या वर्षावासोबत असूरसेना गारद झाली. काही भयभीत असुर औंधासुरा पर्यंत पोहचले एका स्त्रीने अशाप्रकारे मत द्यावी या विचाराने पेटलेला औंधासुर आपल्या आयुधासह यज्ञाकडे धावला.
अंबेच्या दिशेने कोणी वृक्ष फेकले तर कोणी पाषाण फेकले पण बाणांच्या दणक्याने ते अवाढव्य वृक्षहि हवेतून रोखून जमिनीवर पडले.
मायावी औंधासुराने सैन्यांची माघार लक्षात येताच विद्या बोलण्यास सुरुवात केली एक सोडलेला बाण क्षणात १०० रूपे घेऊन मातेच्या दिशेने जात. यमाई सुध्दा त्याचे उत्तर त्याच मंत्राने परत पटवी. आकाश्यात जणू बाणांची क्षणभर रेलचेल होत आणि क्षणात बाणांचे चुरडे जमिनीवर पडत.
औंधासुराने रागाने खङग मंत्रून फेकला पण खङग आकाशात आहे तोच अंबेने त्रिशूल फेकला त्रिशूल व खङग जेव्हा भिडले तेव्हा त्याच्या ठिकऱ्या उडून खङग नष्ट झाले आणि त्रिशूल अंबेच्या हातात परत विराजमान झाले.
सर्व शास्त्रे नाकाम झाली, औंधासुर हताश झाला. यज्ञ मात्र सुरळीत चालू होता.
शास्त्रे संपल्यावर औंधासुर अरण्याकडे पाळला. औंधासुराने पर्वतास्त्र उगारले... अवाढव्य डोंगर उठू लागले धरणी कंप झाला. अंबेने आपल्या हाती वज्रास्त्र उचलले तसे धरणी कंप थांबला डोंगर पर्वत शांत... जागीच निश्चल झाले.
औंधासुराने अग्नीचा वर्षाव केला तो अंबेने पर्जन्याने विजावला.
औंधासुराची सर्व अस्त्रे सुधा फिकी पडू लागल्याने औंधासुर मायावी युध्द करू लागला अदृश्य राहून वार करू लागला. त्यामुळे ढगातून अचानक अस्त्र प्रवाह होई. औंधासुराने ढगांना भिंत बनवली त्याच्या आड तो लपला होता. जगदंबेने वायूअस्त्र सोडले व सर्व ढगांना पळवून लावले. आता औंधासुराला लपायला जागा नव्हती. हे तुंबळ युध्द सुरु होऊन पाचवा दिवस होता पण याचे भान कोणालाच नव्हते. देवी खूपच क्रुध्द झाली होती. तिने निर्वाणीचा शेवटचा बाण उचलला औंधासुर भीतीने थरथर कपात होता. बाण सळसळत औंधासुराजवळ गेला क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. एका चीत्काऱ्या बरोबर निरव शांतता पसरली. औंधासुराचे शीर धडावेगळे पडले होते.
आज अन्यायाचा, अधर्माचा अंत होऊन धर्म स्थापना झाली होती. धडावेगल्या मस्तकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ते मस्तक बोलू लागले - आंबे, आदिमाते, तुझ्या हातून माझा अंत होतोय हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनेक शूरवीर योद्धे, ज्योतिबा यांना युद्धात हरवल्याने मला गर्व झाला होता पण तो गर्व आज नष्ट झाला. माझ्या पापाचे फळ मला मिळाले आहे. आता एकच तुला आई मागणे आहे.
तुझी कीर्ती जशी अजरामर राहील तसे माझे नाव सुध्दा अजरामर राहू दे, या नगरीला माझे नाव राहू दे , तुझे दर्शन मला नित्य नियमित घडू दे तुझ्या मंदिरा बाहेर मला जागा दे आणि माझीही पूजा होऊ दे...
अंतसमयी होणारी हि याचना एकूण देवी द्रविली तिने औंधासुराला वरदान दिले. या नगरीला " औंध" हे नाव अर्पण केले. तसेच देवी जिथे अंतर्धान पावली तेथे देवीची मूर्ति स्थापना झाली, त्यामुर्तीचा समोर औंधासुराचे शीर स्थापले गेले.
आज सुध्दा यमाई मंदिराच्या समोरच देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन घडेल या पद्धतीने औंधासुराचे छोटे मंदिर बांधले गेलेले आढळते. भक्त यमाई दर्शनाबरोबर औंधासुराचे देखील दर्शन आवरुजून घेतात.
हा युद्धाचा कालावधी चैत्रातील पाच दिवसांचा आहे, तो यमाईचा विजय उत्सवाच्या स्वरुपात साजरा होतो. याला 'चैत्र उत्सव', ' वासंतिक उत्सव' म्हणतात. संस्थान काळात या पाच दिवसात भोजनाच्या पंक्ती पडत होत्या, पाच दिवस रात्री कीर्तन, भजन चाले त्यातील तासगावकर हरिदासांचे कीर्तन खूप लोकप्रिय होते.
आज देखी चैतरत अंबेची रथातून मिरवणूक काढली जाते .

 

स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
यमाईदेवी तैलचित्र
औंधेश्वर
युध्दप्रसंगावरील तैलचित्र
युध्दप्रसंगावरील तैलचित्र
औंधेश्वर मंदिर
राजवैभव योग हे पुण्यप्रभावानेच उपभोगायला मिळतात. गतजन्माचे पुण्यसंचय, दैवी वरदान असल्याशिवाय आणि सर्वात महत्त्वाचे भक्ती सागर पार केल्या शिवाय हे घडत नाही. औंधच्या राजघराण्याच्या मुळपुरुषा विषयी सुध्दा अशीच एक कथा सांगितली जाते.
औंध घराण्याचे मुळपुरुष त्र्यंबकपंत कुलकर्णी. त्यांची यमाईदेवीच्या चरणी अपार भक्ती होती. त्यांची पत्नी सुस्वभावी होती. त्र्यंबकपंत हे मुळचे किन्हईचे पायवाटेने मधला रस्ता शोधालातर औंध ते किन्हई हे अंतर १६ ते १७ मैलांचे एवढे अंतर दररोज चालत पार करत व देवीच्या दर्शनाला येत यमाईचा डोंगर पायी चढून यमाईचे दर्शन घेऊन गावातील यमाईचे दर्शनासाठी येत दोन्ही देवीचे दर्शन झाल्या नंतर औंधच्या तळ्यामध्ये स्नान करून बरोबर आणलेला शिधा खात व पुन्हा किन्हईस परत जात. हा त्यांचा दिनक्रम जवळ जवळ बारा वर्षे चालला होता, त्यामुळे यमाई माता प्रसन्न झाली व देवीच्या कृपेने त्र्यंबक पंताच्या पत्नीस दिवस गेले तरी सुध्दा त्र्यंबक पंत मात्र आपल्या भक्तीला खंड पडू देत नसत. संसारात असलेले त्र्यंबक भक्ती मात्र संन्यासी वृतीने करत असत. त्यामुळे त्यांचे संसारात लक्ष कमीच होते. पत्नी शिवाय घरात दुसरे बाईमाणूस कोणीच नव्हते त्यामुळे त्र्यंबकांच्या पत्नीला बाळंतपनाची चिंता लागून होती. त्र्यंबकांन तिने आपली चिंता बोलून दाखवली पण त्र्यंबक मात्र यमाईच्या इच्छेपुढे जावून काही होत नाही असे सांगून, यमाईच्या नामस्कारणाचा सल्ला पत्नीला देत.
पत्नीचे दिवस पूर्ण भारत आल्यानंतर पत्नीने मात्र त्र्यंबकांकडे अशा अवस्थेत सोडून औंधला जावू नका, असा हट्ट धरला . घरच्या जेमतेम असणाऱ्या परिस्थिमुळे कुणी चांगली सुईन पैसे देवून तजवीज करणे शक्य नव्हते. पत्नीने त्र्यंबकांच्या दूरच्या बहिणीला बोलावणे पाठवण्याचा सल्ला दिला, आणि बाणी प्रमाणे वेळ जवळ येत होती. परंतु त्र्यंबक मात्र तुझ्या मुळ माझ्या भक्तीत खंड पडू नकोस, घरी राहण्याचा आग्रह धरू नको, असे निक्षून सांगून औंधला निघून गेले. तेथेच देवीला आपले गाऱ्हाणे सांगता सांगता यमाई भक्तीत दंगून गेले.
इकडे त्र्यंबकाच्या पत्नीच्या पोटात दुखू लागले तिने कळवळीने यमाईचा धावा सुरु केला. यमाईमाता त्र्यंबकाच्या भक्तीवर आधीच प्रसन्न होती. त्यामुळे तिने त्र्यंबकाच्या बहिणीचे रूप घेतले व ती दारात उभी राहिली. "वाहिनी दादा मी आले," असे म्हणन तिने हक दिली त्र्यंबका च्या पत्नीला खूप आनंद झाला. प्रत्यक्ष यमाई मातेच्या चरणाचा स्पर्श घराला झाल्यानंतर उनिव किंवा संकट ते कसे राहणार होते ? त्र्यंबकाच्या पत्नीन एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर सर्व दिवस प्रत्यक्ष यमाई सेवेसाठी असल्याने त्र्यंबकाच्या पत्नीला कोणत्याही गोष्टीची उनिव भासली नाही. यमाई मातेने बाळ बालातीनीच्या खाण्यापिण्या पासून कपडे धुण्यापर्यंत सर्व श्रम उचलले, पाणी भरले, घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहिली नाही. यातच बारा दिवस सरले . बाराव्या दिवसी बाळ पाळण्यात घालून त्याचे नाव परशुराम ठेवले. यमाई देवीच्या प्रेमळ सहवासाने शेजारी व गावातील लोक त्र्यंबकाची बहिण गुणी आहे असे कौतुक करू लागले.
औंधच्या यमाईच्या मंदिरात तंद्री लावून बसलेल्या त्र्यंबकांना कोणीतरी माहितीदिली कि 'अरे तुला मुलगा झाला, तुया बहिणीने बाळंतपण केले, घरी गोकुळ नांदते आणि तू येथेच ? ' त्र्यंबकाला आश्चर्य वाटले कि आप कोणताही निरोप न पाहवता आपल्या घरी बहिण सेवेला पोहचली देवीला त्यांनी नास्कर केला व किन्हईला आले. बायकोची चौकशी केली कि बहीण कोठे आहे ?, बायकोने वंस धुण धुवायला गेल्या असतील असे सांगितले. तेव्हा त्र्यंबकाने हि आपली बहिण म्हणजे देवी असावी असे वाटले, उत्सुकता वाटल्याने ते नदीवर गेले तेथेही आपली बहिण नाही, हे पाहून मगरी येताना सर्व गाव करयांना कीचारले कि माझी बहिण पहिला का ? विचारात विचारत ते घरात पोहचले पाहतात तर काय सर्व कपडे धुवून सुकायला टाकलेले दिसले तेव्हा मात्र त्र्यंबकांची खात्री पटली कि देवी आपल्या घरी आली आणि आपल्या पत्नीला दर्शन दिले घरातील सर्व कामे उरकली. आपण मात्र सेवा करून दर्शनापासून वंचित राहिलो असा विचार करून त्र्यंबकांनि औंधला धाव घेतली व देवी समोर दर्शनासाठी आकांत मांडला. देवीचा धावा सुरु केला तेव्हा देवीने त्यांना दर्शन दिले व तू रोज येथे येवू नकोस मीच किन्हईला येईन असा आशीर्वाद दिला.
त्र्यंबक धन्यता पाऊन घरी परतले. देवीने त्यांना दृष्ठांत देवून 'तुझी कापिली गाय चरायला सोड व जिथे पान्हा सोडेल तेथे माझे अस्तित्व दिसेल.' असे सांगितले त्र्यंबकांनि आपली कापिली गाय चरण्यासाठी सोडली व तिच्या मागून फिरू लागले तहान भूक हरली. गाईने तिसऱ्या दिवशी एका ठिकाणी पान्हा सोडला त्र्यंबकांनि तेथे खणले तेव्हा देवीची स्वयंभू मूर्ती तेथे आढळली वरदान पावलेली हीच ' वरदायिनी ' साखरगड निवसनी' असेही म्हणतात. पुण्य शोक प्रभावाने त्र्यंबकांचा मुलगा परशुराम हा पंतप्रतिनिधी घराण्याचा उगमस्थान ठरला व अतिक्षय शौर्यवंत, पराक्रमी निघाला. छत्रपतींची यांच्यावर नेहमीच संतोष मर्जी राहिली.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
श्री यमाई देवी औंध
साखरगड निवासिनी
किन्हईचा डोंगर
औंधासुराला यमाईदेवीने घनघोर युद्धानंतर यमसदनी धाडले. या लढाईत यमाईदेवीला देखील भरपूर जखमा झाल्या. या जखमांची दाहकता कमी करण्यासाठी देवीने औंध येथील तळ्यात अंघोळ केली. स्नान करताना देवीने आपले केस मोकळे सोडले होते म्हणून देवीला ' मुक्तकेसरी ' किंवा ' मोकळाई ' म्हणून ओळखले जाते. तळ्याच्या दक्षिण या दिशेला जवळच मोकळाईचे मंदिर आहे. या तळ्यातील पाणी भाविकांसाठी तीर्थ ठरले आहे. भाविक या तळ्यात अंघोळ करतात. त्यानंतर मोकळाईचे दर्शन घेतात. त्यामुळे शरीरावरील सर्व व्याधी नाहीशा होतात आशी त्यांची श्रद्धा आहे. मोकळाईचे मंदिर फार पुरातन व संपूर्ण दगडी आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
मोकळाई देवी
गावातील तळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या तुकाई मंदिरा संबंधी एक दंतकथा सांगितली जाते. दंडकारण्यात वनवास भोगत असताना सीतेचे रावणाने हरण केले. सीतेच्या विरहाने दु:खी कष्टी झालेले राम, सीतेचा सर्वत्र शोध घेत औंध परिसरात पोहोचले. व्याकूळ श्रीरामांना पाहून यमाईने श्रीरामांनची परीक्षा घेण्याचे ठरवले. यमाई देवीने सीतेचे रूप धारण केले व श्रीरामांन समोर गेली. श्रीरामांना स्वत:हा सीता असल्याचे सांगितले. पण अंतरज्ञानी श्रीरामांनी यमाईदेवीला म्हणजेच आपल्या गेल्या जन्मातील मातेला ओळखले. त्यांनी यमाईदेवीकडे पाहून सहजच उदगार काढले, " तू का आई अशी आलीस ?" तेव्हा यमाईने प्रसन्न होवून प्रत्यक्ष दर्शन दिले व विजयीभव असा आशिर्वाद दिला.
तेव्हापासून यमाईदेवी ' तुकाई ' या नावानेहि ओळखली जावू लागली. जेथे यमाईने श्रीरामांना दर्शन दिले तेथे हे मंदिर उभे आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
तुकाईदेवी
ज्योतीबाच मंदिर औंधच्या उत्तर दिशेला औंध पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर एका टेकडीवर उभारले आहे ज्योतीबाच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. यमाईदेवीचा रुसवा घालवण्यास ज्योतीबा औंधास येण्यास निघाले. संत, महंत व भक्तगण मूळपीठ औंध येथे जमले. वाद्ये वाजवित, गुलाल उधळीत सार्वजन औंधपिठावर पोहोचले ज्योतीबा समिप येताच यमाईने दार लाऊन घेतले. पण ज्योतीबांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने व प्रभावी बोलण्याने देवीची समजूत घातली. उदार मनाने ज्योतीबाने माफी मागीतली. देवीनेही त्यांना माफ करत प्रसन्न मनाने त्यांचे स्वागत केले. या प्रसंगावेळी ज्योतीबा, भक्तगण, साधुसंत यांची भगवती भक्तांनी सोय केली. भगवती भक्तांनी सर्वाना आंबिल देवून सर्वांचा श्रमपरिहार केला. या सेवेवर ज्योतीबा प्रसन्न झाले व त्यांना वरदान दिले " आपण आंबिले नावाने प्रसिद्ध व्हाल. " या आशिर्वादाबरोबर आंबिले नाव अजरामर झाले. दरवर्षी ज्योतीबा औंधपीठावर येवून चैत्रात देवीचा उत्सव साजरा करत . देवी एकदा ज्योतीबांना म्हणाली, " आपण दरवर्षी औंधला येण्याचे श्रम घेता एक वर्षी मी आपल्याकडे येते. आपले राज्य कसे आहे हे तरी पाहूया. " ज्योतीबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे यमाई रत्नाचलच्या चंपक बनात प्रकट झाली. ज्योतीबांच्या रत्नाचल डोंगरावर यमाईचे मंदिर आहे. या भेटीप्रीत्यर्थ तेथे चैत्रात मोठी यात्रा साजरी केली जाते.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
ज्योतीबा
चैत्र महिन्यात "वासंतिक उत्सव", अश्विन महिन्यात "शारदीय नवरात्र उत्सव" तर पौष महिन्यात "पौषी उत्सव" असे देवीचे वर्षातून तीन प्रमुख उत्सव असतात. पैकी पौषी उत्सव मोठ्या प्रमाणावर यात्रा भरवून साजरा केला जातो याच काळात दररोज देवीची भोगी घातली जाते. यमाई देवीच्या महापुजेला भोगी असे म्हणतात. विशेषत: पौष महिन्यात खूप महत्वपूर्ण आहे. पौष शुध्द द्वितीयेला राजघराण्यातील व्यक्तींच्या हस्ते देवीची भोगी करुण्यात येवून पौषी उत्सवास प्रारंभ होतो.
भोगीचे स्वरूप : पर्वणीतील महापूजेचा (भोगी) प्रारंभ पहाटे पाच वाजता काकड आरतीने होतो. त्यानंतर मुख प्रक्षालन व गणपती पूजन झाल्यानंतर चांदीच्या चार वाट्यांत कलशोदक औंधमध्ये यमाई देवीच्या पौषी उत्सवाची तयारी घेऊन त्यात विविध पूजा साहित्य घालून ते उदक देवीच्या चरणांवर, हातांवर व मुखावर घालतात. त्यानंतर अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान, पंचोपचार पूजा, आदिशक्तीची आरती, शिकरण स्नान, शिकेकाई व उष्णोदक स्नान, अभिषेक, औक्षण, त्यानंतर नैवेद्य, वाद्यांच्या गजरात महाआरती, मंत्रपुष्प व देवीचे स्तोत्र म्हणण्यात येते. शेवटी शंखातील पवित्र तीर्थ सर्वत्र शिंपडून तीर्थ व प्रसाद वाटण्यात येते. या सर्व विधीचे मंत्र स्वरबद्ध करण्यात आले असून, ते सुरेल आवाजात (स्वरात) पारंपरिक पद्धतीने म्हणण्यात येतात. महापूजेचा हा विधी सुमारे तीन तासांचा असून, तो पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य.....
देवीची मुळ मूर्ती