मातृभूमीपासून दूर गेलेल्या लेकरांची
औंध बद्दल कृतकृत्य असलेल्या प्रेमिकांची
यमाईला कुलदैवत मानणाऱ्या भाविकांची
कलेसाठी जीवन अर्पण केलेल्या प्रत्येक कलाकाराची
आमच्या संकेत स्थळाला भेट देणाऱ्या प्रत्येक रसिक वाचकाची आम्हाला साथ हवी आहे.
सहभाग : औंध... एक सामाजिक उपक्रम !

औंध... एक साद !
एक मुंगी दुसऱ्यामुंगीच्या किंवा अन्नाच्या शोधात जाते ती फक्त वासावर ...
वटवाघूळ रस्ता ठरवते ध्वनीच्या लहारेवर ...
हत्तीच्या एकाच चित्कारात ताकद असते ती फर्लांगावरील सर्व हत्तींना एकत्र बोलवण्याची ...
संध्याकाळी सोनेरी किरणं पक्षांना चाहूल देतात घरी परतण्याची ...
कोल्हेकुई संकेत असतो सर्वांना एकत्र बोलवण्याचा ...
आदिवासींचे विचित्र आवाज, घुमणारे शंख इशारा देतात शत्रूशी लढण्याचा ...
प्रत्येकाची भाषा वेगळी पण अर्थ एकच आहे...
तुम्हाला हक देणारं कुणीतरी आहे आणि आपण सगळे एकत्र आहोत.
मी औंध.इन्फोचा सारथी असलो तरी मला माहित आहे, माझ्या पाठीशी सर्व औंधकर असतील.
मी दिलेली हाक तुमच्या प्रतिसादाने आणखी बुलंद करा. तुमच्या मदतीचा हात आमच्या पर्यंत पोहचू द्या,
हिचं एक कळकळीची विनंती तुम्हाला आहे.....

| सहभाग.....
मूळपीठ देखावा

पैशाची गरज नाही, माणसांची आहे. कारण, माणूस पैसा मिळवितो; पैसा माणसाला मिळवीत नाही. उलट, केव्हां केव्हां पैश्याच्या उपाधीमुळें माणसाचा माणूसपणा जातो. औंधमध्ये काम व्हावयाचें असेल ( तोपर्यंत कामाला खरी सुरवातही झाली म्हणतां येणार नाहीं ) तर माणसें पाहिजेत.
काम करावयास पुढें यावें तें,

१) पोट भरवायला येऊं नये.
२) अधिकार गाजवायाला येऊं नये.
३) यश मिळवायला येऊं नये.
४) मेहरबानी करावयाला येऊं नये, तर केवळ
५) प्रेरणेनें, श्रद्धेनें आपलें कर्तव्य दिसत असेल तर तें बजावयासं यावें.

म्हणजे वरील सारीं फळें आपोआप मिळतील.
शिक्षण आधी का सांपत्तिक सुधरणा आधीं ? सामाजिक सुधरणा करावी का धार्मिक सुधारणा करावी ?
हा वाद नको आहे !
जळत्या घराचा वासा जसा ओढावा तसें ज्यानें त्यानें आपल्या हातास येईल तें काम करावें तरच कळकळ खरी.

| सहभाग.....
मूळपीठ देखावा

औंध.इन्फो ह्या संकेतस्थळाला संजीवनी देण्याचे काम खाली नमूद केलेल्या तुमच्या सारख्यां औंधकरांच्या धनाच्या वज्रमूठीनेचं केलेली आहे.

 

क्रं.

देणगीदारांचें नावं

ठिकाण

देणगी रुपये

सन

-

-

-

-

| देणगी | सहभाग.....
दक्षिणा स्विकारताना औंधचा 'गजराज'
| देणगी | सहभाग.....
औंध मुळपीठावरील 'मनकवडी नाणी'
औंध मुळपीठावरील 'मनकवडी नाणी'