घड्याळातील काट्यांच्या हालचालीबरोबर सेकंद, मिनिट, तास धावू लागतात.
या धावपळीत काही क्षण सुवर्ण इतिहास घडवतात,
काही पाहटेच्या दवंबिंदू प्रमाणे विरून जातात
तर काही खूपच दुर्मिळ असतात...
अश्याच काही आगामी क्षणाची चाहूल.....
चालू घडामोडी : औंध... एक आगामी आकर्षण !

औंध, श्री यमाई देवीची यात्रा - शुक्रवार दि. १० जानेवारी २०२० ते गुरुवार दि. २३ जानेवारी २०२०

औंध ......... एक लोकोत्सवाचा सोहळा !

 

भगवतीभक्त जेव्हा गर्दी करून जगदंबेचा उधो उधो म्हणत जयघोष करतात
तेव्हा गुलाबी रंग आसमंत बहरुण टाकतो.
नवसाचे कौतुकाचे दीप ... दीपमाळेवर ज्योत पेटवण्यास सर्वांची घाई,
तसेच रथाची रस्सी खेचण्यास चढाओढ, मनात दाटलेली भक्ती आणि एकच ओढ ...
प्रत्येक मंदिराला भेट देणारा ' छबिना ' व त्याचा डौल यांचा रंग वेगळा,
कुणी यात्रेतील तमाशा पाहताना लहरीवर डोलतो क्षणात फेटा सुद्धा वर उडतो ...
तर कुणी कीर्तनातील स्वरांचा ताल ऐकताना तल्लीन होऊन टाळ नसेल रती हाताची टाळी वाजवतो.
तरुणाई धाव घेते ती कुस्तीच्या फडात ... कोण मर्दानगीचा शड्डू ठोकतो आणि कोण पडतो ...
भरधाव धावणाऱ्या बैलाच्या शर्यतीतील ढवळ्या - पवळ्याचं कौतुक तर निरांजणाच्या वाती, गुलाल उधळून होते...
औंधच्या बैलशर्यती जशा आकर्षून घेणाऱ्या तसचं बैलबाजार एक आवडीची बैलजोडी मिळवण्याचं हक्काच ठिकाणं...
चित्रकला, रांगोळी, सजावट, स्वच्छता या स्पर्धा घरच्याचं पण क्रिकेटनही नव्याची चाहूल या स्पर्धेत दिली आहे.
औंध आणि औंधची यात्रा बालका पासून वृद्धापर्यंत सर्वांनाच आपलीशी वाटणारी ...

 

- सौ. वर्षा आनंद साळुंखे

 

श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२० ते गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२० या १४ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन...

 

 

शुक्रवार - दिनांक १० जानेवारी २०२०.    

सायंकाळी ७ वाजता - यमाई देवी छबिना, दिपोत्सवाने यात्रेला सुरुवात.

शनिवार - दिनांक ११ जानेवारी २०२०.

दुपारी १२ वाजता - श्री यमाई देवी रथ महोत्सवास प्रारंभ

रविवार - दिनांक १२ जानेवारी २०२०.

क्रिकेट स्पर्धा

मंगळवार - दिनांक १४ जानेवारी २०२०.

भव्य श्वान स्पर्धा

बुधवार - दिनांक १२ जानेवारी २०२०.

कुस्त्यांचे जंगी मैदान ( आखाडा )

 

 

टीप : कुस्त्यांच्या जोड्या मंगळवार - दिनांक २२ जानेवारी २०२०. रोजी स. ९. वा. श्री यमाई देवी मंदिरात लावल्या जातील.

 

 

औंध.इन्फो परिवारातर्फे श्री यमाई देवीच्या यात्रेस हार्दिक शुभेच्छा !!!

 

 

स्त्रोत : श्री. यमाई देवस्थान ट्रस्ट, यात्रेची कार्यक्रम पत्रिका | चालू घडामोडी .....
औंध दीपोत्सव
औंध, श्री यमाई देवीची यात्रा

शिवानंद स्वामी प्रतिष्टान, ७३ वा औंध संगीत महोत्सव २०१३

७३ व्या औंध संगीत महोत्सवाचा प्रारंभ दि २४ ऑक्टोबर २०१३ रोजी सकाळी ९:३० वाजता होईल.
आणि २५ ऑक्टोबर २०१३ रोजी सकाळी लवकर समाप्त होईल होईल.
स्थळ औंध कला मंदिर, औंध
* खाली दिलेल्या वेळापत्रक बदलण्याचा विषय आहे.

 

सत्र

कलावंत

कामगिरी

हार्मोनियम

तबला

सकाळी ९:३० ते सकाळी १०

प्रारंभीचा समारंभ

 

   

 

 

 

   

१.

आरती कुंडलकर

गायन

सुयोग कुंडलकर

स्वप्नील भिसे

 

 

 

   

२.

पल्लवी जोशी व अपूर्वा गोखले

जुगलबंदी

चैतन्य कुंटे

किशोर पांडे

 

 

 

   

३.

पंडिता शुभदा पराडकर

गायन

चिन्मय कोल्हटकर

प्रवीण करकरे

 

 

 

   

दुपारी १ ते २

भोजन विश्रांती

 

   

 

 

 

   

सायंकाळी ४ ते ७:४५

 

 

   

४.

रमाकांत गायकवाड

गायन

सुयोग कुंडलकर

स्वप्नील भिसे

 

 

 

   

५.

प्रचला अमोणकर

गायन

चैतन्य कुंटे

किशोर पांडे

         

६.

विवेक सोनार

बासरी

 

किशोर पांडे

 

 

 

   

७.

पं अरुण कशाळकर

गायन

सुयोग कुंडलकर

प्रवीण करकरे

         

संध्याकाळी ७:४५ ते ८:१०

प्रकाशन : रियाझ स्मरणिका आणि डॉ सुचेता बिडकर यांचे पुस्तक संगीत शास्त्र विज्ञान भाग २ एम. ए. संगीत

 

भोजन विश्रांती

रात्री ९ च्या पुढे

 

 

   

८.

प्रेरणा देशपांडे

कथक

   
         

९.

रवींद्र परचुरे

गायन

चिन्मय कोल्हटकर

स्वप्नील भिसे

         

१०.

केदार बोडस

गायन

चैतन्य कुंटे

प्रवीण करकरे

         

११.

पूर्णिमा धुमाळे

गायन

चिन्मय कोल्हटकर

स्वप्नील भिसे

         

१२.

योगराज नाईक

सितार

 

किशोर पांडे

         

१३.

पंडित नयन घोष

तबला सोलो

चिन्मय कोल्हटकर

 
         

१४.

पंडित बनराव हळदणकर

गायन

सुयोग कुंडलकर

प्रवीण करकरे

         

महोत्सव समाप्ती २५ ऑक्टोबर २०१३ रोजी पहाटे ०६.०० वाजता

औंध.इन्फो परिवारातर्फे " ७३ वा औंध संगीत महोत्सव २०१३" यास हार्दिक शुभेच्छा !!!

स्त्रोत : शिवानंद स्वामी प्रतिष्टान, औंध संगीत महोत्सव २०१३, कार्यक्रम पत्रिका | चालू घडामोडी .....
औंध कला मंदिर
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

औंध.इन्फो तर्फे श्री यमाई श्रीनिवास हायस्कुलातील झांजपथकात खेळणाऱ्या शालेय विध्यार्थांना टी-शर्ट भेट - सोमवार दि. २८ जानेवारी, २०१३

 

गेल्या काही वर्षांपासून पाहतोय कि डि. जे. चा रथोत्सवातील प्रभाव वाढत आहे तरुणाईच काय लहान मुले सुद्धा त्या आवाजावर थिरकताना दिसत आहेत पण डि. जे.च्या गगनभेदी आवाजात हरवतोय तो माझ्या शाळेतील झांजपथक, लेझीमपथकांचा नाजूक स्वर.
मी या दोनही पथकांत १५-१६ वर्षांपूर्वी खेळत होतो, त्यावेळी आम्ही शाळेचा गणवेष घालूनच खेळत असू व त्याकरीता जवळ जवळ दीड दोन महिने ५० मुले मुली तयारी करीत असू .
आज सुद्धा थोड्या फार प्रमाणात का होईना या दोनही पथकांत मुले मुली खेळताना पाहून उर भरून येतो म्हणूनच या माझ्या बालमित्रांना हि छोटीशी भेट.

- श्री. आनंद मोहन साळुंखे

 

| चालू घडामोडी .....
श्री. श्री. विद्यालय, औंध